• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

‘फिट इंडिया संडे ऑन सायकल उपक्रमाचे केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री खडसे यांच्या हस्ते पंढरपूरात उद्घाटन

पाच हजार सायकलस्वारांचा सहभाग, राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
June 23, 2025
in क्रिडा, महाराष्ट्र
0
‘फिट इंडिया संडे ऑन सायकल उपक्रमाचे केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री खडसे यांच्या हस्ते पंढरपूरात उद्घाटन

जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) : केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते ‘फिट इंडिया संडे ऑन सायकल – पंढरपूर २०२५’ या उपक्रमाचे उद्घाटन रविवारी पंढरपूर येथे रेल्वे मैदानावर झाले. ५००० हून अधिक सायकलस्वारांनी सहभागी होत, १० लाख किलोमीटरहून अधिक अंतर पार करत भारतातील सर्वात मोठ्या सायकल मेळाव्याचा विक्रम प्रस्थापित केला.

महाराष्ट्र, कर्नाटक व मध्यप्रदेशातील ९० पेक्षा जास्त सायकलिंग क्लबमधून आलेल्या सायकलप्रेमींनी या उपक्रमात उत्साहाने सहभाग घेतला. या सायकलस्वारांनी ४०० ते ४५० किलोमीटरचा सायकल प्रवास करत सोलापूर जिल्ह्यातील पवित्र वारी स्थळ पंढरपूर गाठले. पंढरपूर नगरीत त्यांनी नगर प्रदक्षिणा आणि पारंपरिक रिंगण सोहळ्यात सक्रिय सहभाग घेतला.

या उपक्रमाचे आयोजन भारतीय क्रीडा प्राधिकरण प्रादेशिक केंद्र – मुंबई व पंढरपूर सायकल वारी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. कार्यक्रमात “फिटनेस का डोस – आधा घंटा रोज” या राष्ट्रीय घोषवाक्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

या वेळी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयप्रकाश गोरे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, विधान परिषद सदस्य प्रशांत परिचारक, रणजितसिंह मोहिते पाटील, भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे प्रादेशिक संचालक पांडुरंग चाटे (IRS), आणि १९ वेळा आयर्नमॅन ठरलेले प्रसिद्ध एंडुरन्स सायकलस्वार डॉ. अमित समर्थ (नागपूर) यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व सायकलप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे म्हणाल्या की, “सायकलिंग ही केवळ एक खेळाची किंवा व्यायामाची बाब नसून ती पर्यावरणस्नेही, आरोग्यवर्धक आणि शाश्वत जीवनशैलीचा भाग आहे. प्रत्येकाने फिटनेससाठी दररोज किमान अर्धा तास शारीरिक हालचाल करणे आवश्यक आहे. पंढरपूर सारख्या श्रद्धास्थळी हा उपक्रम पार पडणे म्हणजे अध्यात्म, आरोग्य व पर्यावरण यांचा सुंदर संगम आहे.”

रेल्वे मैदान ‘फिट इंडिया – संडे ऑन सायकल’अशा घोषणात चैतन्यशील व प्रेरणादायी वातावरणाने गजबजून गेले होते. सायकलिंगमुळे शाश्वत वाहतूक, सामूहिक आरोग्य आणि पर्यावरणाबाबत जागरूकतेचा संदेश समाजात रुजवला जात आहे. हा उपक्रम फिट इंडिया चळवळीला चालना देणारा ठरला आहे.

Next Post
बँकेत चलन भरताना वृद्धाच्या पिशवीतून ५० हजार लंपास; तीन महिलांविरोधात गुन्हा दाखल

बँकेत चलन भरताना वृद्धाच्या पिशवीतून ५० हजार लंपास; तीन महिलांविरोधात गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

बिल पास करण्यासाठी अधिकाऱ्याने मागितली लाच ! एसीबीने रंगेहात पकडले; गुन्हा दाखल
खान्देश

बिल पास करण्यासाठी अधिकाऱ्याने मागितली लाच ! एसीबीने रंगेहात पकडले; गुन्हा दाखल

October 16, 2025
स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई!.. पेट्रोल पंप दरोड्याचा पर्दाफाश; सहा आरोपी जेरबंद, मुद्देमाल जप्त
खान्देश

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई!.. पेट्रोल पंप दरोड्याचा पर्दाफाश; सहा आरोपी जेरबंद, मुद्देमाल जप्त

October 16, 2025
संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश
खान्देश

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश

October 14, 2025
मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श
कृषी

मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श

October 14, 2025
जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा’ने सन्मानित
खान्देश

जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा’ने सन्मानित

October 14, 2025
अवैध गांजा वाहतुक करणारे दोन तस्कर जेरबंद!; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
खान्देश

अवैध गांजा वाहतुक करणारे दोन तस्कर जेरबंद!; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

October 14, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group