• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

एरंडोल हादरले! १३ वर्षीय मुलाचा गळा चिरलेला मृतदेह आढळला, परिसरात खळबळ

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
June 17, 2025
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
एरंडोल हादरले! १३ वर्षीय मुलाचा गळा चिरलेला मृतदेह आढळला, परिसरात खळबळ

जळगाव, (प्रतिनिधी) : एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथून बेपत्ता झालेल्या १३ वर्षीय मुलाचा खर्ची गावाजवळ गळा चिरलेल्या अवस्थेत मंगळवार दि. १७ जून रोजी सकाळी ८ वाजता मृतदेह आढळून आला आहे. यामुळे तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली असून एरंडोल पोलीस स्टेशन तपास करीत आहे.

तेजस गजानन महाजन (वय १३, रा.रिंगणगाव ता. एरंडोल) असे मयत बालकाचे नाव आहे. तो रिंगणगाव येथे आई, वडील, मोठी बहीण यांच्यासह राहत होता. तेजसचे वडील गजानन हे शेती काम करून हार्डवेअरचे दुकान चालवत उदरनिर्वाह करीत आहेत. दरम्यान सोमवार दि. १६ जून रोजी गजानन महाजन यांनी त्यांचा १३ वर्षीय मुलगा तेजस महाजन याला दुकानावर बसवून जळगावला कामानिमित्त निघून गेले होते. तर तेजस हा दुकान बंद करून घरी जाणे कुटुंबीयांना अपेक्षित होते. मात्र तेजस घरी आला नाही. सोमवारी गावाच्या बाजाराचा दिवस देखील होता. म्हणून शोधाशोध सुरू झाली. एरंडोल पोलीस स्टेशनला कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली.

यानंतर पोलिसांनी निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपासचक्र फिरवीत तेजसचा शोध रात्रभर सुरू ठेवला होता. अखेर मंगळवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास एरंडोल तालुक्यातील खर्ची गावाजवळ निंबाळकर यांच्या शेतामध्ये १३ वर्षीय मुलाचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत असल्याची माहिती एरंडोल पोलिसांना काही ग्रामस्थांनी दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन खात्री केली असता मृतदेह तेजस महाजन याचाच असल्याचे स्पष्ट झाले. या घटनेमुळे कुटुंबीयांना जबर धक्का बसला आहे. घटनास्थळी मोबाईल फॉरेनसिक व्हॅन दाखल झाली असून तपास सुरू झाला आहे. दरम्यान बालकाची हत्या करण्यामागील कारण काय याबाबतचा तपास पोलीस करत असून सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने काही इसमांची संशयित म्हणून धरपकड केली असल्याचे समजते. खुनाच्या घटनेमुळे पुन्हा एकदा जिल्हा हादरला आहे.

Tags: #jalgaon #maharashtraCrimeJalgaon
Next Post
पारोळ्यात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; शहरात शोककळा

पारोळ्यात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; शहरात शोककळा

ताज्या बातम्या

कर्मचाऱ्यांनी दबावाखाली न येता प्रामाणिकपणे काम करावे; उपमहापौर मनोज चौधरी यांचे आवाहन
जळगाव जिल्हा

कर्मचाऱ्यांनी दबावाखाली न येता प्रामाणिकपणे काम करावे; उपमहापौर मनोज चौधरी यांचे आवाहन

March 16, 2026
मालेगावचे दुचाकी चोरटे जळगावात गजाआड; जिल्हापेठ पोलिसांची कारवाई
गुन्हे

मालेगावचे दुचाकी चोरटे जळगावात गजाआड; जिल्हापेठ पोलिसांची कारवाई

March 16, 2026
जळगाव महापालिकेत कर्मचाऱ्यांसाठी पहिल्यांदाच ‘जनता दरबार’
जळगाव जिल्हा

जळगाव महापालिकेत कर्मचाऱ्यांसाठी पहिल्यांदाच ‘जनता दरबार’

March 15, 2026
नातेवाईकाने गुंगीचे पेय देऊन महिलेवर केला अत्याचार; एकाला बेड्या
गुन्हे

नातेवाईकाने गुंगीचे पेय देऊन महिलेवर केला अत्याचार; एकाला बेड्या

March 15, 2026
पोलीस ठाण्यातच राडा; माजी नगरसेवक सोनवणे आणि ठाकरे गटात तुंबळ हाणामारी
गुन्हे

पोलीस ठाण्यातच राडा; माजी नगरसेवक सोनवणे आणि ठाकरे गटात तुंबळ हाणामारी

March 15, 2026
प्रकाश तेली यांच्या ‘शाश्वत विचार’ ग्रंथाचे पद्मश्री चैत्राम पवार यांच्या हस्ते प्रकाशन
जळगाव जिल्हा

प्रकाश तेली यांच्या ‘शाश्वत विचार’ ग्रंथाचे पद्मश्री चैत्राम पवार यांच्या हस्ते प्रकाशन

March 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group