• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

रावेरच्या जंगलात थरारक पाठलाग; मध्य प्रदेशातील गावठी कट्टे विक्रेते जेरबंद

जळगाव एलसीबीची मोठी कारवाई

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
June 11, 2025
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
रावेरच्या जंगलात थरारक पाठलाग; मध्य प्रदेशातील गावठी कट्टे विक्रेते जेरबंद

जळगाव, (प्रतिनिधी) : येथील एलसीबीच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीवरून रावेर तालुक्यात पाल येथील दुर्गम भागात सिनेस्टाइल पाठलाग करून दोन गावठी कट्टे विक्रेत्यांना अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध रावेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे स.फौ. रवी नरवाडे व पो.हे.कॉ. गोपाल गव्हाळे यांना दि. ८ जून २०२५ रोजी गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मध्यप्रदेशातील दोन इसम गावठी कट्टे विक्रीच्या उद्देशाने महाराष्ट्रात येत असून ते पाल, ता. रावेर मार्गे जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार रवी नरवाडे यांनी तत्काळ ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना कळविली. संदीप पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.उप.निरीक्षक शरद बागल, स.फौ. रवी नरवाडे, पो.हे.कॉ. गोपाल गव्हाळे, पो.हे.कॉ. नितीन बाविस्कर, पो.कॉ. बबन पाटील आणि चा.पो.हे.कॉ. दिपक चौधरी यांच्या पथकाची तात्काळ स्थापना करून कारवाईच्या सूचना दिल्या.

पथकाने रावेर पोलीस स्टेशन अंतर्गत पाल दुर्गम भागातील जंगल परिसरात सापळा रचला. सायंकाळच्या सुमारास अंदाजे ४५ वर्षीय इसम, ज्याने निळी पगडी घातलेली होती, तो दुचाकी (क्र.एमपी १० झेडसी ९६५०) ने व त्याच्या पाठोपाठ २५ वर्षीय इसम हा (क्र. एमपी १० एमव्ही १४६२) ने मोटरसायकलवरून येताना दिसून आले. सदर पथकातील पोलीस अंमलदारांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पथकातील अधिकाऱ्यांनी सिनेस्टाईल पाठलाग करत आणि दुसऱ्या बाजूस सापळा लावून, शिताफीने दोघा आरोपींना ताब्यात घेतले.

अंगझडती दरम्यान दोघांकडून ०२ गावठी कट्टे, ०२ मोटरसायकली, ०२ मोबाईल हँडसेट असा एकूण अंदाजे ₹१,७०,०००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात गोविंदसिंग ठानसिंग बरनाला (वय-४५, रा. सिरवेल महादेव, ता. भगवानपुरा, जि. खरगोन,म.प्र.), निसानसिंग जिवनसिंग बरनाला (वय-२३, रा. उमर्टि ता. वरला, जि. बडवाणी, ह.मु. सिरवेल महादेव, ता. भगवानपुरा म.प्र.) यांना अटक करण्यात आली. या दोघांना रावेर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पो.उप.निरीक्षक तुषार पाटील, रावेर पोलीस स्टेशन हे करत आहेत.

Tags: Crime
Next Post
शेतकऱ्यांच्या १० वर्षांच्या लढ्याला यश! महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयातील साहित्याची जप्ती

शेतकऱ्यांच्या १० वर्षांच्या लढ्याला यश! महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयातील साहित्याची जप्ती

ताज्या बातम्या

जळगाव महिला मंडळातर्फे शनिवारी हळदी-कुंकू सोहळा; ‘पैठणी’ जिंकण्याची सुवर्णसंधी
खान्देश

जळगाव महिला मंडळातर्फे शनिवारी हळदी-कुंकू सोहळा; ‘पैठणी’ जिंकण्याची सुवर्णसंधी

January 14, 2026
जळगाव मनपा निवडणुक: गुरुवारी ५१६ केंद्रांवर मतदान, शुक्रवारी दुपारी लागणार निकाल!
खान्देश

जळगाव मनपा निवडणुक: गुरुवारी ५१६ केंद्रांवर मतदान, शुक्रवारी दुपारी लागणार निकाल!

January 13, 2026
जळगाव: प्रभाग १३ मध्ये महायुतीचे ‘शक्तिप्रदर्शन’; भव्य दुचाकी रॅलीने वेधले नागरिकांचे लक्ष
खान्देश

जळगाव: प्रभाग १३ मध्ये महायुतीचे ‘शक्तिप्रदर्शन’; भव्य दुचाकी रॅलीने वेधले नागरिकांचे लक्ष

January 13, 2026
भाजपचा शिस्तीचा बडगा! जळगाव मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीत ३ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी
खान्देश

भाजपचा शिस्तीचा बडगा! जळगाव मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीत ३ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी

January 12, 2026
समता नगरात ललितकुमार घोगले आणि सुरेश पवारांचे जंगी स्वागत; महिलांकडून औक्षण तर ज्येष्ठांचे आशीर्वाद
खान्देश

समता नगरात ललितकुमार घोगले आणि सुरेश पवारांचे जंगी स्वागत; महिलांकडून औक्षण तर ज्येष्ठांचे आशीर्वाद

January 12, 2026
विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली; जळगावात आमदार राजूमामा भोळेंचा घणाघात
खान्देश

विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली; जळगावात आमदार राजूमामा भोळेंचा घणाघात

January 11, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group