जळगाव, (प्रतिनिधी) : छत्रपती संभाजी नगर येथील वैद्य सूफी हकीम अब्दुल मतीन अशरफी हे जळगाव जिल्ह्यात येत असून भुसावळ येथे दि.१३ व १४ जून रोजी दोन दिवसीय मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात ५ प्रकारच्या आयुर्वेदिक उपचार पध्दतींचा उपयोग केला जाणार असून सोमवारी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देण्यात आली. हकीम अब्दुल मतीन यांची तिसरी पिढी आरोग्य सेवा क्षेत्रात कार्यरत आहे.
भुसावळ येथील वेलकम मॅरेज लॉन्स येथे दि.१३ व १४ जून रोजी सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरात लेपन, पीन पोटली, शिरोधारा, शेक, फिजिओथेरपीद्वारे उपचार केले जाणार आहे.
शिबिरात प्रामुख्याने मायग्रेन, डोकेदुखी, तणाव, चिडचिडपणा, अनिद्रा, अपचन, गॅसेस, एसिडिटी, सुटलेले, फुगलेले पोट, भूक मंदावणे, हात पाय ओढले जाणे, सांधे दुखी, नस दबणे, मणक्याचे आजार यावर उपचार केले जाणार आहेत. शिबिरासाठी सूफी हकीम अब्दुल मतीन अशरफी यांच्यासह मौलाना अतिउर रेहमान, मोहतरम अय्युब शाह गुलाब शाह, वाहीद शाह, अब्दुल रहीम शाह हे परिश्रम घेत आहेत.