• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

८५ वर्षीय वृद्धेची हत्या करून दागिने लुटणारे तिघे अटकेत; ४८ तासांत गुन्हा उघड

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 8, 2025
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
८५ वर्षीय वृद्धेची हत्या करून दागिने लुटणारे तिघे अटकेत; ४८ तासांत गुन्हा उघड

जळगाव, (प्रतिनिधी) : पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेवाळे गावात ५ जून २०२५ रोजी रात्री ९ ते ११ च्या सुमारास एका धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडवली होती. ८५ वर्षीय वृद्ध महिला जनाबाई महारू पाटील यांच्या राहत्या घरात कोणीतरी अज्ञात व्यक्तीने प्रवेश करून त्यांच्या डोक्यात धारदार हत्याराने वार करून कानातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरून त्यांचा खून केला होता. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ सूत्रे फिरवत अवघ्या ४८ तासांत तिघा आरोपींना जेरबंद केले आहे.

मयताचा मुलगा, कृष्णराव महारू पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध ६ जून २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जळगावचे पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखा आणि पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याला गोपनीय माहिती काढून समांतर तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याकडील तपास पथकाने शेवाळे गावामध्ये कसून चौकशी केली. या तपासात साहिल मुकद्दर तडवी (वय २१), राकेश बळीराम हातागडे (वय २१), आणि राजेश अनिल हातागडे (वय १८) (सर्व रा. शेवाळे, ता. पाचोरा, जि. जळगाव) अशी तीन आरोपींची नावे निष्पन्न झाली.

पोलिसांनी या तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, मयत जनाबाई महारू पाटील यांच्या घराच्या ओट्यासमोर हे आरोपी नेहमी बसायचे आणि टिंगल टवाळी करायचे. जनाबाई पाटील यांनी त्यांना याबद्दल खडसावले होते. याच रागातून आरोपींनी जनाबाई पाटील यांच्या घरात चोरी करायची आणि त्यांचा “काटा काढायचा” असा कट रचला. ठरलेल्या कटाप्रमाणे, ५ जून २०२५ रोजी रात्री आरोपींनी जनाबाई पाटील यांच्या घराच्या मागच्या दाराने आत प्रवेश केला. त्यानंतर, जनाबाई पाटील यांना धारदार हत्याराने मारहाण करून त्यांचा खून केला आणि त्यांच्या कानातील सोन्याचे दागिने ओरबडून घेऊन अंधाराचा फायदा घेत तेथून पळ काढला, अशी कबुली तिन्ही आरोपींनी दिली आहे.

ही कारवाई जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. माहेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव परिक्षेत्र कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी पाचोरा उपविभाग धनंजय येरुळे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे, शरद बागल यांच्यासह पो. उपनि. विठ्ठल पवार, ग्रे. पोउपनि. प्रकाश पाटील, सफौ. अतुल वंजारी, पोहेकों लक्ष्मण पाटील, पोकों जितेंद्र पाटील, भूषण पाटील, किशोर पाटील, भरत पाटील, महेश सोमवंशी, पिंपळगाव हरेश्वर पो.स्टे. नेमणुकीचे पोहेकों नरेंद्र नरवाडे, अभिजित निकम, अमोल पाटील, इमरान पठाण, मुकेश लोकरे, नामदेव इंगळे, मुकेश तडवी, चापोकॉ. सागर पाटील यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. पुढील तपास पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे हे करीत आहेत.


 

Tags: Crime
Next Post
वंजारी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन

वंजारी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन

ताज्या बातम्या

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!
आरोग्य

जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

October 15, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 15, 2026
नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना
जळगाव जिल्हा

नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना

October 15, 2026
जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक
जळगाव जिल्हा

जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक

October 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add