जळगाव, (प्रतिनिधी) : घरामध्ये वाद झाल्यानंतर पती बाहेर गेला आणि पत्नीने विष प्राशन केले. उपचार सुरू असताना या विवाहितेचा मृत्यू झाला आहे. जळगाव शहर पोलीस ठाण्यात प्राथमिक अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सारिका डिगंबर वाघुळदे (३०, रा. नशिराबाद) असे मयत विवाहितेचे नाव आहे. पती व दोन मुलांसह राहत होत्या. शनिवारी दुपारी पती-पत्नीमध्ये काही कारणावरून वाद झाला. त्यानंतर पती बाहेर गेला. घरी सारिका यांनी विष प्राशन केले. ही घटना लक्षात येताच त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात प्राथमिक अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नशिराबाद येथे शोककळा पसरली आहे.