• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

तेलंगणातील खून प्रकरणातील फरार आरोपी जळगावात जेरबंद

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
May 20, 2025
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
तेलंगणातील खून प्रकरणातील फरार आरोपी जळगावात जेरबंद

जळगाव, (प्रतिनिधी) : तेलंगणा राज्यातील सायबराबाद पोलीस आयुक्तालयातील चंदानगर पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील फरार संशयित आरोपीला जळगाव एलसीबी पोलिसांनी जेरबंद केले आहे.

अझहर निजाम खाटीक (रा. जळगाव) असे या संशयित आरोपीचे नाव असून, तो गुन्हा घडल्यापासून सुमारे तीन महिन्यांपासून फरार होता. चंदानगर पोलीस स्टेशनचे पथक आरोपीच्या शोधासाठी जळगाव जिल्ह्यात दाखल झाले होते. या पथकाने जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची भेट घेऊन त्यांना गुन्ह्याची माहिती दिली आणि आरोपीला पकडण्यासाठी स्थानिक पोलिसांच्या मदतीची विनंती केली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधिक्षक यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाला सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश दिले. त्यानंतर सहाय्यक फौजदार विजयसिंग पाटील आणि पोलीस हवालदार अक्रम शेख यांचे एक विशेष पथक तयार करून त्यांना आरोपीला शोधून ताब्यात घेण्याच्या सूचना व मार्गदर्शन केले.

या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे आरोपी अझहर निजाम खाटीक याचा शोध सुरू केला. तो मेहरुण परिसरात लपल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. पाठलाग करून पोलिसांनी अझहरला शिताफीने ताब्यात घेतले. पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला चंदानगर पोलीस स्टेशन, पोलीस आयुक्तालय सायबराबाद (तेलंगणा) यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Tags: Crime
Next Post
पाचोरा-भडगावमध्ये शिवसेनेचा ‘मिशन १ लाख’ सदस्य नोंदणीचा निर्धार ; २५ मे रोजी शहरात भव्य तिरंगा रॅली !

पाचोरा-भडगावमध्ये शिवसेनेचा 'मिशन १ लाख' सदस्य नोंदणीचा निर्धार ; २५ मे रोजी शहरात भव्य तिरंगा रॅली !

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात व्हीडीओ एन्डोस्कोपीद्वारे होणार अचूक निदान
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात व्हीडीओ एन्डोस्कोपीद्वारे होणार अचूक निदान

April 22, 2026
JCL T-20 चा थरार : जामनेर, जळगाव आणि अमळनेर संघांची विजयी घोडदौड
क्रिडा

JCL T-20 चा थरार : जामनेर, जळगाव आणि अमळनेर संघांची विजयी घोडदौड

April 21, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘आयसीआरईएसटी-२०२६’ आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘आयसीआरईएसटी-२०२६’ आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन

April 21, 2026
चोपडा येथील हत्येचा थरार: अवघ्या २४ तासांत स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींना ठोकल्या बेड्या
गुन्हे

चोपडा येथील हत्येचा थरार: अवघ्या २४ तासांत स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींना ठोकल्या बेड्या

April 21, 2026
पटेल नगरचा पाणीप्रश्न सुटणार; नवीन जलवाहिनीच्या कामाचे भूमिपूजन
जळगाव जिल्हा

पटेल नगरचा पाणीप्रश्न सुटणार; नवीन जलवाहिनीच्या कामाचे भूमिपूजन

April 21, 2026
JCL T-20 चा थरार : पाचोरा, चाळीसगाव आणि सातपुडा हिरोजची मैदानात बाजी!
क्रिडा

JCL T-20 चा थरार : पाचोरा, चाळीसगाव आणि सातपुडा हिरोजची मैदानात बाजी!

April 21, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group