• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

नदीत पाय घसरून पडल्याने तरुणाचा बुडून मृत्यू ; पाचोरा तालुक्यातील घटना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
May 17, 2025
in जळगाव जिल्हा
0
नदीत पाय घसरून पडल्याने तरुणाचा बुडून मृत्यू ; पाचोरा तालुक्यातील घटना

पाचोरा, (प्रतिनिधी) : तालुक्यातील माहेजी गावाजवळील गिरणा नदी पात्रात डोहात पाय घसरून पडल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या प्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आकाश राजेश यादव (वय २५) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याच्या पश्चात वृद्ध आई-वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे. पशुपालन करून तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. आकाश यादव हा गुरुवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास माहेजी गावाजवळील गिरणा नदी पात्रात म्हशींना पाणी पाजण्यासाठी गेला होता. यावेळी अचानक त्याचा पाय घसरून तो थेट नदीतील खोल डोहात पडला. आकाशला पोहता न येत असल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. सायंकाळ झाली तरी आकाश घरी परतला नसल्याने त्याच्या भावाने शोध घेण्यास सुरुवात केली. यावेळी त्याचा मृतदेह नदीतील डोहात आढळून आला.

लगेचच त्याला पाचोरा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. यावेळी त्याच्या कुटुंबाने शोक व्यक्त केला. आकाश यादव हा अत्यंत मेहनती, शांत स्वभावाचा तरुण होता. त्याच्या मृत्यूमुळे माहेजी गावावर शोककळा पसरली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Next Post
कुटुंबीय बाहेरगावी असताना घराला लागली भीषण आग, ५ लाखांचे नुकसान !

कुटुंबीय बाहेरगावी असताना घराला लागली भीषण आग, ५ लाखांचे नुकसान !

ताज्या बातम्या

रामराव तायडे यांना ‘राष्ट्रीय कामगार भूषण’ पुरस्कार प्रदान
जळगाव जिल्हा

रामराव तायडे यांना ‘राष्ट्रीय कामगार भूषण’ पुरस्कार प्रदान

July 27, 2025
जुन्या वैमनस्यातून दोन तरुणांमध्ये सशस्त्र संघर्ष; एकाचा मृत्यू, एक गंभीर
गुन्हे

जुन्या वैमनस्यातून दोन तरुणांमध्ये सशस्त्र संघर्ष; एकाचा मृत्यू, एक गंभीर

July 27, 2025
जळगावात गणेशोत्सवासाठी लगबग: सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाची पहिली नियोजन बैठक संपन्न
जळगाव जिल्हा

जळगावात गणेशोत्सवासाठी लगबग: सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाची पहिली नियोजन बैठक संपन्न

July 27, 2025
फरारी रोड रॉबरीचा आरोपी अखेर जेरबंद; जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई
गुन्हे

फरारी रोड रॉबरीचा आरोपी अखेर जेरबंद; जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

July 27, 2025
जैन इरिगेशनची दमदार कामगिरी : पहिल्या तिमाहीत उत्पन्न आणि नफ्यात विक्रमी वाढ!
जळगाव जिल्हा

जैन इरिगेशनची दमदार कामगिरी : पहिल्या तिमाहीत उत्पन्न आणि नफ्यात विक्रमी वाढ!

July 27, 2025
एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशन जळगाव परिमंडळाची नवीन कार्यकारिणी जाहीर
जळगाव जिल्हा

एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशन जळगाव परिमंडळाची नवीन कार्यकारिणी जाहीर

July 25, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group