• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणारा चोरटा अटकेत

जळगाव एलसीबीची कामगिरी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 17, 2025
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणारा चोरटा अटकेत

जळगाव, (प्रतिनिधी) : येथील एमआयडीसी परिसरातील एका लॉन्सवर ६ फेब्रुवारी रोजी झालेल्या लग्न समारंभात ८५ वर्षीय ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील २१ ग्रॅम सोन्याची चैन भामट्याने गोड बोलून चोरी केली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेने कसून तपास करत मेहरूण येथील एका संशयित आरोपीला अटक केली आहे.

अनिल विजय हरताडे (वय ३०, रा. लक्ष्मी नगर, गेंदालाल मिल, जळगाव) याने ही चोरी केली असल्याची माहिती एलसीबीला तपासातून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला जळगाव शहरातून ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्याने गुन्हा कबूल केला असून चैन त्यानेच चोरल्याची कबुली दिली. संशयित आरोपी अनिल हरताडे याला अटक करण्यात आली असून त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.

पोलीस अधीक्षक माहेश्वरी रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, सहाय्यक फौजदार विजयसिंह पाटील, अतुल वंजारी, बाबासाहेब पाटील, अक्रम शेख यांनी ही कारवाई केली. पुढील तपास एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार दत्तात्रय बडगुजर करत आहेत.

Tags: Crime
Next Post
मेहंदीच्या दिवशीच तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या ! ; अमळनेर शहरातील घटना

मेहंदीच्या दिवशीच तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या ! ; अमळनेर शहरातील घटना

ताज्या बातम्या

पडदा पडला, पण नानांचा अभिनय कायम स्मरणात राहणार
खान्देश

पडदा पडला, पण नानांचा अभिनय कायम स्मरणात राहणार

October 8, 2026
सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता
जळगाव जिल्हा

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता

October 7, 2026
एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
जळगाव जिल्हा

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

October 7, 2026
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!
गुन्हे

क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!

October 7, 2026
नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add