• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अंगावर वीज पडून तरुणाचा मृत्यू ; एरंडोल तालुक्यातील घटना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
May 17, 2025
in जळगाव जिल्हा
0
अंगावर वीज पडून तरुणाचा मृत्यू ; एरंडोल तालुक्यातील घटना

एरंडोल, (प्रतिनिधी) : तालुक्यात खर्ची सुकेश्वर परिसरात गिरणा नदीमध्ये मासे पकडून पायी घरी जात असलेल्या तरुणाचा अंगावर वीज पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना दि.१६ मे रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.

शरद रामा भिल (वय ४०, रा.कामतवाडी ता. धरणगाव) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. तो परिवारासह गावात राहत होता. त्यांचे सासरे लक्ष्मण श्रावण ठाकरे यांच्याकडे ते शुक्रवारी खर्ची गावात आले होते. शुक्रवारी दुपारी गिरणा नदीच्या पात्रात मासे पकडण्यासाठी शरद भिल्ल हे सुकेश्वर शिवारात गेले होते. त्यांचे सासरे गावाला लागून असलेल्या एका शेतात थांबलेले होते. मासे पकडून सासऱ्यांसोबत शरद भील हे घरी जाणार होते. दरम्यान मासे पकडून घरी पायी जात असताना त्यांच्यावर विज पडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

ग्रामस्थांना खबर कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांचा मृतदेह एरंडोल ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. मात्र तेथे वैद्यकीय पथकाने तपासून शरद भील यांना मयत घोषित केले. शरद भील यांच्या छातीवर, कानावर जखमा आहेत. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.

एरंडोल पोलिस स्टेशनचे एएसआय राजेश पाटील, हेड कॉन्स्टेबल महेंद्रसिगं पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पुढील कार्यवाही एरंडोल पोलीस स्टेशनचे निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे या घटनेमुळे कामतवाडी गावावर शोककळा पसरली आहे. खर्ची गावात मात्र या घटनेमुळे खळबळ उडाली. एरंडोल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.

Next Post
वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणारा चोरटा अटकेत

वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणारा चोरटा अटकेत

ताज्या बातम्या

प्रकाश तेली यांच्या ‘शाश्वत विचार’ ग्रंथाचे पद्मश्री चैत्राम पवार यांच्या हस्ते प्रकाशन
जळगाव जिल्हा

प्रकाश तेली यांच्या ‘शाश्वत विचार’ ग्रंथाचे पद्मश्री चैत्राम पवार यांच्या हस्ते प्रकाशन

March 14, 2026
कामचुकारपणा आणि गैरप्रकार खपवून घेणार नाही; उपमहापौरांचा आरोग्य विभागाला सज्जड इशारा!
जळगाव जिल्हा

कामचुकारपणा आणि गैरप्रकार खपवून घेणार नाही; उपमहापौरांचा आरोग्य विभागाला सज्जड इशारा!

March 14, 2026
अल्पवयीन मुलीचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन विनयभंग; ‘पोक्सो’अंतर्गत कारवाई
गुन्हे

अल्पवयीन मुलीचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन विनयभंग; ‘पोक्सो’अंतर्गत कारवाई

March 14, 2026
जळगाव जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये १४ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालत
जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये १४ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालत

March 13, 2026
नितीन पाटील यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची ‘पीएच.डी.’
खान्देश

नितीन पाटील यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची ‘पीएच.डी.’

March 13, 2026
महाराष्ट्रावर अवकाळीचे सावट: पुढील पाच दिवस ढगाळ हवामान, तर काही जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
जळगाव जिल्हा

महाराष्ट्रावर अवकाळीचे सावट: पुढील पाच दिवस ढगाळ हवामान, तर काही जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा

March 13, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group