जळगाव | शहरातील तिरुपती एलमच्या संचालिका ममता सुनीत काबरा यांनी गणेशोत्सवात मूर्ती विसर्जनामुळे होणाऱ्या जल प्रदूषणावर आळा घालण्यासाठी तुरटी पासून गणेश मूर्ती तयार करण्याची संकल्पना राबविली आहे.
दरम्यान त्यांच्या चिंचोली येथील कारखान्यात मोठ्या प्रमाणावर तुरटी पासून गणेश मूर्ती बनवल्या जात आहेत. ही मूर्ती पाण्यात विसर्जित केल्यानंतर दोन तासात पूर्णपणे विरघळून जाते, यामुळे थोड्याफार प्रमाणात का होईना आपण जल प्रदूषण रोखण्यास मदत करू शकतो. अशी माहिती ममता काबरा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दरम्यान पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अशा प्रकारच्या पर्यावरण पूरक गणेश मुर्ती खरेदी करून नागरिकांनी गणेश उत्सव साजरा करावा व जलप्रदूषण रोखण्यास हातभार लावावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी सुनित काबरा आणि सुमित काबरा उपस्थित होते.