• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बंदुकीने डोक्यात गोळी झाडून प्रौढाची आत्महत्या ; भुसावळ शहरातील घटना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
May 12, 2025
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
बंदुकीने डोक्यात गोळी झाडून प्रौढाची आत्महत्या ; भुसावळ शहरातील घटना

भुसावळ, (प्रतिनिधी) : शहरातील गंगाराम प्लॉट भागामध्ये एका प्रौढ व्यक्तीने कौटुंबिक वादातून बंदुकीने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दि. १२ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

डिगंबर मेंदिराम बढे (वय ५२, रा. गंगाराम प्लॉट, भुसावळ) असे मयत प्रौढ इसमाचे नाव आहे. ते पत्नीसह राहत होते. मनीष ट्रॅव्हल्स येथे ते मेंटेनन्स विभागात काम करीत होते. काही दिवसांपासून त्यांचे पत्नीशी कौटुंबिक वाद झाले होते. या वादातून त्यांची पत्नी माहेरी निघून गेली होती. डिगंबर बढे यांच्या मुलीचा विवाह झाला असून त्या सासरी खडकी ता. भुसावळ येथे राहतात. सोमवारी सकाळी ११ वाजता डिगंबर बढे यांनी घरी कोणी नसताना त्यांच्या खोलीमध्ये बंदुकीने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली.

गोळीचा आवाज ऐकताच शेजारी नागरिक धावत आले. सदरची घटना पाहताच अनेकांना धक्का बसला. याबाबत भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासणी सुरू केली आहे. तसेच घटनास्थळी मोबाईल फॉरेनसिक व्हॅन दाखल झाली. त्यांनी काही नमुने तपासणीसाठी घेतले आहे. दरम्यान आत्महत्येसाठी वापरलेली बंदुक विनापरवाना असल्याचे तसेच त्यात एकच काडतूस असल्याचे तपासात दिसून आले आहे. गोळी थेट डोक्यात शिरून अडकून बसली आहे. पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी तपास करीत आहेत. तर इसमाच्या आत्महत्येमुळे भुसावळ तालुक्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

Tags: BhusawalCrime
Next Post
शहीद सुनील पाटील यांच्या पुतळ्याचे घोडगावात अनावरण

शहीद सुनील पाटील यांच्या पुतळ्याचे घोडगावात अनावरण

ताज्या बातम्या

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा

February 26, 2026
‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या
जळगाव जिल्हा

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

February 26, 2026
रावेर पोलिसांची मोठी कारवाई; बुऱ्हाणपूरच्या व्यापाऱ्याला लुटणारे ७ संशयित जेरबंद!
गुन्हे

रावेर पोलिसांची मोठी कारवाई; बुऱ्हाणपूरच्या व्यापाऱ्याला लुटणारे ७ संशयित जेरबंद!

February 25, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group