• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगावातून चोरलेल्या कार मिळाल्या राजस्थानातील वाळवंटात !

एलसीबीची कारवाई, दोन जणांना अटक

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 9, 2025
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
जळगावातून चोरलेल्या कार मिळाल्या राजस्थानातील वाळवंटात !

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील विविध भागातून तीन महागड्या चारचाकी वाहनांच्या चोरीची घटना ९ एप्रिल रोजी घडली होती. या प्रकरणी शहरातील जिल्हापेठ, रामानंदनगर व जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. दाखल गुन्ह्यात महिनाभरानंतर एलसीबीने अर्थात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगावातून चोरीला गेलेली वाहने हजार किलो मीटर दूर असलेल्या राजस्थानातील वाळवंटातून जप्त केली आहे. या प्रकरणी दोन संशयितांना अटक केली आहे.

चारचाकी वाहन चोरीला गेल्यानंतर संबंधित पोलिस स्टेशनकडून तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून देखील समांतर तपास सुरु होता. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अनेक सीसीटीव्ही फुटेज तपासले, मात्र या प्रकरणी ठोस माहिती मिळत नव्हती. पोलिस उपनिरीक्षक शरद बागल यांना त्यांच्या एका गुप्त सुत्रधाराकडून या वाहनांबाबतची माहिती मिळाली. त्यानंतर काही मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण करून शहरातून चोरीला गेलेल्या चारचाकी वाहनांचे धागेदोरे राजस्थानात सांचोर, जि.जालोर असल्याचे कळले. त्यानंतर शरद बागल यांनी ३ पोलिसांना सोबत घेऊन राजस्थान गाठले.

राजस्थानातील सांचोर या ठिकाणाहून एलसीबीच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने दोन संशयितांना अटक केली. त्यामध्ये सुनील केशाराम बिष्णोई (वय २५) व सुनील ओमप्रकाश बिष्णोई (वय २४, दोन्ही रा.सरनाऊ, ता.सांचोर,जि.जालोर, राजस्थान) या अटकेतील दोघांची चौकशी केली असता, त्यांच्या इतर दोन साथीदारांची माहिती मिळाली. अटकेतील दोघांना सफौ अतुल वंजारी व हरीलाल पाटील यांनी राजस्थानहून जळगावला आणले. तर उपनिरीक्षक शरद बागल मात्र त्याच ठिकाणी तळ ठोकून होते. काही दिवस विरळ वस्तीच्या वालुकामय भागात पाहणी केली असता, एका जंगलात बेवारस स्थितीत एक कार आढळून आली. त्या कारचा फोटो फिर्यादीला पाठविला असता, चोरीला गेलेली कार असल्याचे लक्षात आले. त्यानंतर ही कार पोलिसांनी हस्तगत करून, जळगावला आणण्यात आली आहे. इतर संशयित आरोपींचा व कारचा शोध देखील सुरु आहे.

ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, एएसआय अतुल वंजारी, हवालदार हिरालाल पाटील, हवालदार विजय पाटील, चालक शिपाई महेश सोमवंशी यांच्या पथकाने केली.

Next Post
शेततळ्यात पाय घसरून पडल्याने बालकासह तरुणाचा मृत्यू !

शेततळ्यात पाय घसरून पडल्याने बालकासह तरुणाचा मृत्यू !

ताज्या बातम्या

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!
आरोग्य

जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

October 15, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 15, 2026
नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना
जळगाव जिल्हा

नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना

October 15, 2026
जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक
जळगाव जिल्हा

जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक

October 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add