जळगाव, (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत १८ कोटी ८८ लाख ७३ हजार ९६६ रुपयांचे विद्यावेतन वितरित करण्यात आले आहे. या योजनेत एकूण ४,९६५ प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग घेतला असून २१३ आस्थापनांचा समावेश आहे. योजनेत ऑगस्ट ते डिसेंबर या महिन्यादरम्यान हे विद्यावेतन वितरित करण्यात आले आहे. या योजनेमुळे राज्यातील युवकांना प्रशिक्षण मिळण्यास आणि त्यांच्या कौशल्य विकासास मदत होत आहे.
विद्यावेतनाची माहिती..
▪️ऑगस्ट: ४०६ प्रशिक्षणार्थ्यांना १२,२६,०६४.१२ रुपये.
▪️सप्टेंबर: ४०३० प्रशिक्षणार्थ्यांना २,२८,१३,४००.५८ रुपये.
▪️ऑक्टोबर: ४५११ प्रशिक्षणार्थ्यांना ७,०७,८०६.४३ रुपये.
▪️नोव्हेंबर: ४४२२ प्रशिक्षणार्थ्यांना ४,०९,३४४,००.१ रुपये.
▪️डिसेंबर: ४३४१ प्रशिक्षणार्थ्यांना ३,९९,०७,६७७.९३ रुपये.