• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मेव्हण्याने केला शालकाचा खून ! ; विम्याची रक्कम हडपण्यासाठी केले कृत्य

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 29, 2025
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
मेव्हण्याने केला शालकाचा खून ! ; विम्याची रक्कम हडपण्यासाठी केले कृत्य

जळगाव, (प्रतिनिधी) : धुळे जिल्ह्यातील फागणे येथील शालकाची विम्याची रक्कम हडप करण्यासाठी शेवगे ता. पारोळा येथील मेव्हण्याने एकाच्या मदतीने शालकाचा अपघात झाल्याचा बनाव करून खून केल्याची घटना उघडकीस आली. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयाने ३ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

धुळे जिल्ह्यातील फागणे येथील समाधान शिवाजी पाटील याचा अपघाती मृत्यू झाल्याप्रकरणी दि. १९ एप्रिल रोजी पारोळा पोलिस स्टेशन येथे अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आला होता. डीवायएसपी विनायक कोते, पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमरसिंग विसावे, पोहेकॉ सुनील हटकर, संजय पाटील, अनिल राठोड, अभिजीत पाटील यांनी सखोल तपास केला. यात काहीतरी वेगळे असल्याचं जाणवले.

यात मयताचा मेव्हणा संदीप भालचंद्र पाटील (वय ४०, रा.शेवगे ता.पारोळा) तसेच चंद्रदीप आधार पाटील (वय ४५, रा.खवशी ता.अमळनेर) यांनी कट रचून शालक समाधान पाटील याचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. संदीप पाटील याने शालक समाधान पाटील याच्या नावावर विमा पॉलिसी काढून ठेवल्याचे उघडकीस आले. तसेच अपघातात वापरलेली स्कुटी (एम एच ५४ ए ९५१३) ही देखील पूर्णपणे इन्शुरन्स काढलेली होती. समाधानचा खून करून त्याची विमा पॉलिसीची रक्कम व दुचाकीची विम्याची रक्कम आपल्याला मिळावी या हव्यासापोटी समाधानचा खून केल्याचे उघडकीस आले आहे.

पोलिसांनी दोघा आरोपीना अमळनेर तालुक्यातून अटक केली आहे. पोलिसांनी कसून चौकशी केली असता समाधान याला संदीप व चंद्रदीप यांनी धुळे ते जळगाव जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला घेऊन जाऊन अंधारात लोखंडी रॉडने मारहाण करून शालक समाधान यास जीवे ठार केल्याची कबुली दोघी आरोपींनी दिली आहे. पुढील तपास डीवायएसपी विनायक कोते करीत आहेत.

Tags: CrimedhulemaharashtraPolice
Next Post
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत जिल्ह्यात १८ कोटी रूपये विद्यावेतन वितरित

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत जिल्ह्यात १८ कोटी रूपये विद्यावेतन वितरित

ताज्या बातम्या

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!
आरोग्य

जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

October 15, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 15, 2026
नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना
जळगाव जिल्हा

नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना

October 15, 2026
जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक
जळगाव जिल्हा

जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक

October 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add