• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

भरारी फाउंडेशनच्या भूजल पुनर्भरण अभियानाला प्रारंभ

चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
April 28, 2025
in जळगाव जिल्हा
0
भरारी फाउंडेशनच्या भूजल पुनर्भरण अभियानाला प्रारंभ

जळगाव, (प्रतिनिधी) : येथील भरारी फाउंडेशन व क्रेडाई जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २८ एप्रिल ते २० जून या दोन महिन्याच्या दरम्यान राबविण्यात येणाऱ्या भूजल पुनर्भरण अभियानाच्या १२ व्या वर्षाला प्रारंभ झाला आहे. रविवारी चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून अभियानाचा शुभारंभ झाला. यावेळी आ. सुरेश भोळे, अनिश शहा, डॉ.पी आर चौधरी, धनंजय जकातदार, अनिल कांकरिया, रवींद्र लढ्ढा, दिपक सराफ, आदर्श कोठारी, चित्रा चौधरी, सपन झुनझुनवाला, अनिल भोकरे, अमर कुकरेजा, विजय वाणी, सेवानिवृत्त सहायक वनसंरक्षक एस आर पाटील, प्रविण पाटील उपस्थित होते.

पावसाळ्यात छताचे पाणी जमिनीत सोडण्याचे नियोजन (रेन वॉटर हार्वेस्टिंग) याबाबतच्या माहितीचा चित्ररथ शहरात विविध ठिकाणी फिरुन रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम बसविण्याचा संकल्प करण्याचे आवाहन, शहरातील नागरिकांना करण्यात येणार आहे. भूजल पातळी वाढवण्यासाठी पावसाळ्याच्या पाण्याचा विनियोग या विषयावर दोन महिने जनजागृती करणार आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग, पावसाळ्याच्या पाण्याचा विनियोग या विषयावर लघू चित्रपट स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, पथनाट्य यांसारखे कार्यक्रम होणार आहेत.

शहरातील सर्व मोकळ्या पटांगणात शोष खड्डे तयार करून त्यात पावसाचे पाणी जमिनीत मुरावे यासाठी लागणाऱ्या गोष्टींसाठी त्यांच्यातर्फे सर्वोतपरी सहकार्य होईल,असे आश्वासन आ.सुरेश भोळे यांनी दिले. तसेच क्रेडाईचे अनिश शहा यांनी आपल्या मनोगतामध्ये सर्व नवीन बांधकामांना भूजल पुनर्भरण यंत्रणा बसविण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करू असे सांगितले.

दरम्यान या अभियानांतर्गत भूजल पुनर्भरण यंत्रणा बसविल्या, अशा शहरातील दहा नागरिकांचा जलरत्न सन्मान करण्यात आला. यात रवींद्र लढ्ढा, नरेंद्र चौधरी, लखीचंद जैन, जितेंद्र चौहान, प्रदीप अहिरराव, शंतनू चौधरी, मनीषा पाटील, शुभश्री दप्तरी, निलेश झोपे, रोहिणी देशमुख यांचा समावेश होता. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अक्षय सोनवणे, सागर पगारीया, निर्णय चौधरी, सागर परदेशी, निलेश पाटील, रोहिणी मोरडिया यांनी सहकार्य केले. प्रास्ताविक दीपक परदेशी तर आभार दिपक सराफ यांनी मानले.


 

Next Post
शिक्षिकेच्या गळ्यातील सोन्याच्या मंगळसूत्राची धावत्या बस मधून चोरी

गलवाडे रस्त्यावर ट्रक चालकाची अडवणूक ; गळ्याला चाकू लावून मागितले पैसे

ताज्या बातम्या

अमळनेरच्या तीन महिन्यांच्या बालिकेला नवजीवन; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वी उपचार!
आरोग्य

अमळनेरच्या तीन महिन्यांच्या बालिकेला नवजीवन; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वी उपचार!

June 2, 2026
वेस्ट टू एनर्जी: डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या ‘अन्नपुर्णालयम’मध्ये कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती!
जळगाव जिल्हा

वेस्ट टू एनर्जी: डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या ‘अन्नपुर्णालयम’मध्ये कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती!

June 2, 2026
भोकर येथे ७५ गरजूंना गृहपयोगी संच वितरण व आरोग्य तपासणी
जळगाव जिल्हा

भोकर येथे ७५ गरजूंना गृहपयोगी संच वितरण व आरोग्य तपासणी

June 2, 2026
जळगाव विधान परिषदेचा सस्पेन्स संपला! भाजप कडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी जाहीर
जळगाव जिल्हा

जळगाव विधान परिषदेचा सस्पेन्स संपला! भाजप कडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी जाहीर

June 1, 2026
मेहरुण येथे श्रीराम प्रभू संघातर्फे ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस उत्साहात साजरा
जळगाव जिल्हा

मेहरुण येथे श्रीराम प्रभू संघातर्फे ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस उत्साहात साजरा

May 31, 2026
जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन; १५०० विद्यार्थी करणार कृषी उद्योजकतेचे सादरीकरण
कृषी

जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन; १५०० विद्यार्थी करणार कृषी उद्योजकतेचे सादरीकरण

May 31, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group