जळगाव, (प्रतिनिधी) : येथील आर्थिक गुन्हे शाखेने जमीन फसवणूक बाबत मिळकतीचा करारनामा करुन बांधकाम व्यावसायिकाची १ कोटी १५ लाख रुपयात फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात संशयित आरोपी म्हणून मनोज लिलाधर वाणी यांना अटक करण्यात आली आहे.
सुनील मधुकर चौधरी (रा.चिंतामणी नगर, धरणगाव) यांनी जळगाव शहर पोलीस स्टेशनला दि. ३ फेब्रुवारी २०२५ ला फिर्याद दिली होती. त्यानुसार दि. १ जानेवारी २०२३ रोजी संशयित मनोज वाणी, शैलेंद्र भिरुड यांनी महानगरपालीका हद्दीतील सि. स.नं. २११२/६० क्षेत्र ५५७.०० चौ.मि. चा जुने बाधीव घर दाखविले व मिळकतीचे मूळ मालक यांचे सोबत झालेली सौदा पावती दाखवून फिर्यादी सुनील चौधरी यांचेसोबत त्या आधारे दि.१५ मे २०२३ ला नोटरी करारनामा करुन दिलेली असताना जुने बांधीव घर खरेदी करुन दिले नाही. त्यांनी फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली. म्हणून गुन्हा दाखल झाला होता.
याप्रकरणात मनोज लिलाधर वाणी, कल्पना मनोज वाणी, शैलेंद्र हेमचंद भिरुड, हेमलता ऊर्फ तनुजा शैलेंद्र भिरुड, तीलोतमा दिपक इंगळे, दिपक पितांबर इंगळे, संदीप हरीभाऊ पाटील, राजेंद्र गोपाळ सावदेकर, शेखर भास्कर भिरुड, शिरीष भास्कर भिरुड, नरेंद्रकुमार दत्तात्रय भिरुड, ज्ञानेश्वर दत्तात्रय भिरुड, गौरव कृष्णा भिरूड या १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्व एक दुस-यांचे नार्तेवाईक असुन मनोज वाणी, कल्पना वाणी, शैलेंद्र भिरूड या तिघांनी संगनमत करून जळगाव महानगर पालीका हददीतील सि.सं.नं. २११२/६० या जुने बांधीव घर सौदा पावती आल्याचे सागून फिर्यादीसोबत त्या मिळकतीचा करारनामा करुन त्या पोटी १ कोटी १५ लाख रुपये घेवून जिवे ठार मारण्याची धमकी देवून फिर्यादी सुनील चौधरी यांची आर्थिक फसवणूक केली आहे. म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या गुन्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेने मनोज लीलाधर वाणी यांना अटक केली आहे.