• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गावठी कट्टा बाळगणाऱ्याला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 27, 2025
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
गावठी कट्टा बाळगणाऱ्याला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक

जळगाव, (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिरसोली रोडवर असलेल्या जकात नाक्या जवळ विक्री करण्याच्या उद्देशाने गावठी बनावटीचे पिस्तूल सह पाच जिवंत काडतुस बाळगणाऱ्या एकास जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून ताब्यात घेतले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत शनिवार दि.२६ रोजी मुदस्सीर नझर सलीम परवेझ शेख (रा. ताबापुरा ता. जि. जळगाव) याला अटक करण्यात आली आहे. शिरसोली रोडवरील हॉटेल आमंत्रणच्या अलीकडे जळगाव जकातनाका येथे सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.

त्याच्या ताब्यातून गावठी कट्टा मॅग्झीनसह ०५ जिवंत काडतूस, दुचाकी (क्र. एमएच ४७ बियु ०३७७) असा एकूण २ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील कारवाईसाठी त्याला एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदर आरोपीस एक दिवस पोलीस कस्टडी मिळाली असुन त्याचे साथीदारांचा शोध सुरु असुन पुढील तपास पो. उपनिरी. सचिन नवले करीत आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक माहेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत याच्या मार्गदर्शनाखाली स्थनिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरी. बबन अव्हाड, पो. उपनिरी शरद बागल, सफौ राजेश मेढे, अतुल वंजारी,, पोहेकॉ हरीलाल पाटील, विजय पाटील, अक्रम शेख यांनी केली आहे.

Tags: #jalgaon_cityCrime
Next Post
बांधकाम व्यावसायिकाची १ कोटी १५ लाखात फसवणूक केल्याप्रकरणी मनोज वाणी अटकेत

बांधकाम व्यावसायिकाची १ कोटी १५ लाखात फसवणूक केल्याप्रकरणी मनोज वाणी अटकेत

ताज्या बातम्या

भुसावळच्या राजकारणाला नवे वळण; अनिल चौधरी, नगराध्यक्षा गायत्री भंगाळे, निखिल चौधरी शिवसेनेत
जळगाव जिल्हा

भुसावळच्या राजकारणाला नवे वळण; अनिल चौधरी, नगराध्यक्षा गायत्री भंगाळे, निखिल चौधरी शिवसेनेत

September 3, 2026
शानबाग विद्यालयात लोककला प्रशिक्षण शिबिर उत्साहात; ७०० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग
जळगाव जिल्हा

शानबाग विद्यालयात लोककला प्रशिक्षण शिबिर उत्साहात; ७०० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

September 3, 2026
गणेशोत्सव, दसरा, दीपावलीनिमित्त डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ‘भव्य आरोग्य संपदा शिबिर
Uncategorized

गणेशोत्सव, दसरा, दीपावलीनिमित्त डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ‘भव्य आरोग्य संपदा शिबिर

September 3, 2026
कुंटणखान्यावर छापा: पिंप्राळा परिसरात पोलिसांची मोठी कारवाई, चार महिलांची सुटका
गुन्हे

कुंटणखान्यावर छापा: पिंप्राळा परिसरात पोलिसांची मोठी कारवाई, चार महिलांची सुटका

September 2, 2026
उपमहापौरांचा वीज वितरणला सज्जड इशारा: उघडे डीपी व धोकादायक विद्युत तारांवर तातडीने उपाययोजना करा
जळगाव जिल्हा

उपमहापौरांचा वीज वितरणला सज्जड इशारा: उघडे डीपी व धोकादायक विद्युत तारांवर तातडीने उपाययोजना करा

September 1, 2026
गोदावरी नर्सिंग वसतिगृहात श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा उत्साहात; विद्यार्थिनींचा भक्तिभावाने सहभाग
जळगाव जिल्हा

गोदावरी नर्सिंग वसतिगृहात श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा उत्साहात; विद्यार्थिनींचा भक्तिभावाने सहभाग

September 1, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add