जळगाव, (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिरसोली रोडवर असलेल्या जकात नाक्या जवळ विक्री करण्याच्या उद्देशाने गावठी बनावटीचे पिस्तूल सह पाच जिवंत काडतुस बाळगणाऱ्या एकास जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून ताब्यात घेतले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत शनिवार दि.२६ रोजी मुदस्सीर नझर सलीम परवेझ शेख (रा. ताबापुरा ता. जि. जळगाव) याला अटक करण्यात आली आहे. शिरसोली रोडवरील हॉटेल आमंत्रणच्या अलीकडे जळगाव जकातनाका येथे सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.
त्याच्या ताब्यातून गावठी कट्टा मॅग्झीनसह ०५ जिवंत काडतूस, दुचाकी (क्र. एमएच ४७ बियु ०३७७) असा एकूण २ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील कारवाईसाठी त्याला एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदर आरोपीस एक दिवस पोलीस कस्टडी मिळाली असुन त्याचे साथीदारांचा शोध सुरु असुन पुढील तपास पो. उपनिरी. सचिन नवले करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक माहेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत याच्या मार्गदर्शनाखाली स्थनिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरी. बबन अव्हाड, पो. उपनिरी शरद बागल, सफौ राजेश मेढे, अतुल वंजारी,, पोहेकॉ हरीलाल पाटील, विजय पाटील, अक्रम शेख यांनी केली आहे.