• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अट्टल मोटारसायकल चोरी करणारी टोळी जेरबंद ; चार वाहने जप्त

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
April 27, 2025
in गुन्हे
0
अट्टल मोटारसायकल चोरी करणारी टोळी जेरबंद ; चार वाहने जप्त

जळगाव, (प्रतिनिधी) : चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना, जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बाहेर जिल्ह्यातील एका अट्टल मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीला अटक केली आहे. या टोळीकडून चोरी केलेल्या २ लाख ४५ हजार रुपये किंमतीच्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय बातमीदारांकडून माहिती मिळाली. रेकॉर्डवरील गुन्हेगार भगवान उर्फ लंगड्या सिताराम करगळ (रा. सोनगाव, ता. मालेगाव) हा त्याचे साथीदार आकाश गोविंद गायकवाड (रा. जळगाव फाटा, निफाड) आणि दादु संजय सोनवणे (रा. दरेगाव, ता. मालेगाव) यांच्यासोबत मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये सक्रिय आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून भगवान उर्फ लंगड्या याला जळगाव फाटा, निफाड येथून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याचे साथीदार आकाश गायकवाड याला सटाणा (ता. सटाणा) आणि दादु सोनवणे याला दरेगाव (ता. मालेगाव) येथून अटक करण्यात आली.

पोलिसांनी या तिन्ही संशयित आरोपींची कसून चौकशी केली असता, त्यांनी चाळीसगाव शहर व तालुका भागातून तीन मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. या गुन्ह्यांसाठी वापरलेली आणखी एक दुचाकी मोटारसायकल देखील आरोपींकडून जप्त करण्यात आली आहे. भगवान उर्फ लंगड्या सिताराम करगळ याच्यावर जळगाव, नाशिक आणि धुळे जिल्ह्यांमध्ये यापूर्वीही दरोडा, जबरी चोरीचे एकूण १३ गुन्हे दाखल आहेत.

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे, पोलीस हवालदार मुरलीधर धनगर, पोलीस नाईक, महेश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल भुषण शेलार, सागर पाटील, मिलींद जाधव, दिपक चौधरी आणि पोलीस हवालदार भारत पाटील यांच्या पथकाने केली आहे. अटक केलेल्या संशयित आरोपींना पुढील कार्यवाहीसाठी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Tags: Crime
Next Post
ऑनर किलींग : पोलीस पित्याच्या गोळीबारात मुलीचा मृत्यू, जावई गंभीर जखमी

ऑनर किलींग : पोलीस पित्याच्या गोळीबारात मुलीचा मृत्यू, जावई गंभीर जखमी

ताज्या बातम्या

अमळनेरच्या तीन महिन्यांच्या बालिकेला नवजीवन; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वी उपचार!
आरोग्य

अमळनेरच्या तीन महिन्यांच्या बालिकेला नवजीवन; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वी उपचार!

June 2, 2026
वेस्ट टू एनर्जी: डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या ‘अन्नपुर्णालयम’मध्ये कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती!
जळगाव जिल्हा

वेस्ट टू एनर्जी: डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या ‘अन्नपुर्णालयम’मध्ये कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती!

June 2, 2026
भोकर येथे ७५ गरजूंना गृहपयोगी संच वितरण व आरोग्य तपासणी
जळगाव जिल्हा

भोकर येथे ७५ गरजूंना गृहपयोगी संच वितरण व आरोग्य तपासणी

June 2, 2026
जळगाव विधान परिषदेचा सस्पेन्स संपला! भाजप कडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी जाहीर
जळगाव जिल्हा

जळगाव विधान परिषदेचा सस्पेन्स संपला! भाजप कडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी जाहीर

June 1, 2026
मेहरुण येथे श्रीराम प्रभू संघातर्फे ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस उत्साहात साजरा
जळगाव जिल्हा

मेहरुण येथे श्रीराम प्रभू संघातर्फे ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस उत्साहात साजरा

May 31, 2026
जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन; १५०० विद्यार्थी करणार कृषी उद्योजकतेचे सादरीकरण
कृषी

जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन; १५०० विद्यार्थी करणार कृषी उद्योजकतेचे सादरीकरण

May 31, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group