सावदा, (प्रतिनिधी) : येथील भोईवाड्यातील रहिवाशी तरुणाने दि. २५ रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास राहते घरात एकटा असतांना छताच्या हुकला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडली झाली आहे. सावदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
विनायक मनोज पवार (वय २१, रा. भोईवाडा) हा सावदा फैजपूर मार्गावर पाण्याचा व्यवसाय करीत होता. तो आई, भाऊ आणि विवाहित बहीण यांच्यासह राहत होता. विनायक मनोज पवार हा राहते घरात एकटा असताना त्याने छताला गळफास लावून आत्महत्या केली. सुरेश पवार यांनी सावदा पोलीस स्टेशन येथे खबर दिली.
विनायक पवार याला रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. याबाबत सावदा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील याचे मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे.