जळगाव, (प्रतिनिधी) : येथील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद वाणी यांना समाजसेवा, गांधी विचारसरणीचा प्रचार आणि लोक कल्याणासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल गांधी पीस फाउंडेशन, नेपाळ यांच्यावतीने मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली.
हा पदवी प्रदान समारंभ १८ एप्रिल रोजी जळगावातील एका हॉटेल मध्ये पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सुरेश भोळे (राजुमामा) हे होते तर प्रमुख उपस्थित म्हणून सुनील सिंग परदेशी, अविनाश जाधव, राजेंद्र आहेर आदींसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रमोद वाणी यांना मान्यवरांच्या हस्ते मानद प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले.