• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पाय घसरून विहिरीत पडल्याने तरूणाचा बुडून मृत्यू ; पाचोरा तालुक्यात घटना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
April 7, 2025
in जळगाव जिल्हा
0
पाय घसरून विहिरीत पडल्याने तरूणाचा बुडून मृत्यू ; पाचोरा तालुक्यात घटना

जळगाव, (प्रतिनिधी) : पाचोरा तालुक्यात कुरंगी येथे शेतशिवारात विहिरीजवळ गेलेल्या तरुणाचा पाय घसरून पडल्याने विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी दि. ४ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता घडली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

भूषण आनंदा पाटील (वय ३२, रा. कुरंगी ता. पाचोरा) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो कुरंगी गावात आई, वडील, पत्नी, १ मुलगी यांचेसह राहत होता. शेतीकाम करून तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. दरम्यान, रविवारी भूषण पाटील हे त्यांच्या शेतात गेले होते. तेथे विहिरीजवळ काम करीत असताना पाय घसरून पाण्यात पडले व बुडून त्यांचा मृत्यू झाला.

आजूबाजूच्या ग्रामस्थांना कळताच त्यांनी भूषणला पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून भूषण पाटील यांना मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. घटनेमुळे कुरंगी गावावर शोककळा पसरली आहे. घटनेची पाचोरा पोलीस स्टेशनला नोंद घेण्यात आली असून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Next Post
तीर्थंकर प्रभू श्री महावीर यांच्या जन्मकल्याणक महोत्सवास प्रारंभ

तीर्थंकर प्रभू श्री महावीर यांच्या जन्मकल्याणक महोत्सवास प्रारंभ

ताज्या बातम्या

जळगाव महापालिकेत कर्मचाऱ्यांसाठी पहिल्यांदाच ‘जनता दरबार’
जळगाव जिल्हा

जळगाव महापालिकेत कर्मचाऱ्यांसाठी पहिल्यांदाच ‘जनता दरबार’

March 15, 2026
नातेवाईकाने गुंगीचे पेय देऊन महिलेवर केला अत्याचार; एकाला बेड्या
गुन्हे

नातेवाईकाने गुंगीचे पेय देऊन महिलेवर केला अत्याचार; एकाला बेड्या

March 15, 2026
पोलीस ठाण्यातच राडा; माजी नगरसेवक सोनवणे आणि ठाकरे गटात तुंबळ हाणामारी
गुन्हे

पोलीस ठाण्यातच राडा; माजी नगरसेवक सोनवणे आणि ठाकरे गटात तुंबळ हाणामारी

March 15, 2026
प्रकाश तेली यांच्या ‘शाश्वत विचार’ ग्रंथाचे पद्मश्री चैत्राम पवार यांच्या हस्ते प्रकाशन
जळगाव जिल्हा

प्रकाश तेली यांच्या ‘शाश्वत विचार’ ग्रंथाचे पद्मश्री चैत्राम पवार यांच्या हस्ते प्रकाशन

March 14, 2026
कामचुकारपणा आणि गैरप्रकार खपवून घेणार नाही; उपमहापौरांचा आरोग्य विभागाला सज्जड इशारा!
जळगाव जिल्हा

कामचुकारपणा आणि गैरप्रकार खपवून घेणार नाही; उपमहापौरांचा आरोग्य विभागाला सज्जड इशारा!

March 14, 2026
अल्पवयीन मुलीचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन विनयभंग; ‘पोक्सो’अंतर्गत कारवाई
गुन्हे

अल्पवयीन मुलीचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन विनयभंग; ‘पोक्सो’अंतर्गत कारवाई

March 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group