• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

जळगाव तालुक्यातील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 1, 2025
in जळगाव जिल्हा
0
कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

जळगाव, (प्रतिनिधी) : तालुक्यातील भोकर येथे एका कर्जबाजारी शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दि. ३१ मार्च रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास उघड झाली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

लीलाधर जयराम पाटील (वय ५०, रा. भोकर ता. जळगाव) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. ते पत्नी, मुलगा, सून, मुलगी यांच्यासह गावात राहत होते. शेतीकाम करून ते परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. दरम्यान, सोमवारी दि. ३१ मार्च रोजी दुपारी ते घरी एकटेच होते. त्यावेळी त्यांनी छताला गळफास लावून घेत आत्महत्या केली. कुटुंबियांना लक्षात आल्यावर त्यांनी लीलाधर पाटील यांना जळगाव येथे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले.

यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. मयत लीलाधर पाटील यांच्यावर कर्ज असल्यामुळे ते कसे फेडायचे या विवंचनेत ते होते. याच कारणातून नैराश्य येऊन त्यांनी आत्महत्या केली असावी अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे. याप्रकरणी भोकर गावात शोककळा पसरली आहे. जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Next Post
पिसाळलेल्या कुत्र्याला नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केले ठार !

पिसाळलेल्या कुत्र्याला नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केले ठार !

ताज्या बातम्या

नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स – बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!
खान्देश

नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स – बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!

October 11, 2026
महादेव रुग्णालयात गोल्डन अवर्समध्ये रूग्णावरील न्युरोसर्जरी यशस्वी
आरोग्य

महादेव रुग्णालयात गोल्डन अवर्समध्ये रूग्णावरील न्युरोसर्जरी यशस्वी

October 10, 2026
जैन इरिगेशनला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’चा मान!
खान्देश

जैन इरिगेशनला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’चा मान!

October 9, 2026
६५.७० कोटींचे अंमली पदार्थ नष्ट; जळगाव पोलिसांचे अवैध अंमली पदार्थविरोधी मोहिमेत मोठे यश
खान्देश

६५.७० कोटींचे अंमली पदार्थ नष्ट; जळगाव पोलिसांचे अवैध अंमली पदार्थविरोधी मोहिमेत मोठे यश

October 9, 2026
वरणगावात प्लास्टिकविरोधी धडक मोहीम; २५ किलो प्लास्टिक जप्त, ३५ हजारांचा दंड वसूल
खान्देश

वरणगावात प्लास्टिकविरोधी धडक मोहीम; २५ किलो प्लास्टिक जप्त, ३५ हजारांचा दंड वसूल

October 9, 2026
डॉ. वर्षा पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
खान्देश

डॉ. वर्षा पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

October 9, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add