• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शिवरत्न दादा नेवे यांचा 71 वा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा

नेवे ब्रदर्स ग्रंथ दालनास 125 वर्षे पूर्ण

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 26, 2021
in सामाजिक
0
शिवरत्न दादा नेवे यांचा 71 वा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा

जळगाव, दि. 26 – उत्तर महाराष्ट्रातील विश्वासाचं नातं जपणारे नेवे ब्रदर्स या ग्रंथ दालनास एकशे पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याने, त्याच बरोबर नेवे ब्रदर्सचे संचालक शिवरत्न दादा नेवे यांचा 71 वा वाढदिवस अनोख्या पद्धतीने जळगावात बुधवारी साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच संदीप आणि संग्राम जोशी यांनी दादा नेवे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छापर पोवाडा सादर केला.

दादांनी दिलेल्या शिकवणीची आठवण करून देत दादांचा व्यासंग मी देखील पुढे नेणार असल्याची ग्वाही दादा नेवे यांचे चिरंजीव जयवर्धन नेवे यांनी प्रास्ताविकात बोलताना दिली. शिवचरित्राचे अभ्यासक दादा नेवे यांनी सव्वाशे वर्षापासून सुरू असलेल्या आपल्या पुस्तक, साहित्य, ग्रंथ विक्री व्यवसायाच्या माध्यमातून आता पर्यंत अनेकांना ज्ञानार्जनाची संधी उपलब्ध करून दिली. त्यामुळे दादा नेवे यांच्या 71 व्या वाढदिवसानिमित्त त्यांची ग्रंथतुला करण्यात आली. तसेच नेवे यांच्या पाचव्या पिढीचा नामकरण सोहळा देखील करण्यात आला.

याप्रसंगी माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. यावेळी महापौर जयश्री महाजन, आमदार सुरेश भोळे, जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, जळगाव पीपल बँकेचे माजी चेअरमन भालचंद्र पाटील, माजी उपमहापौर रमेश जैन, माजी महापौर नितीन लढ्ढा, विष्णू भंगाळे, करीम सालार, आदींसह नेवे परिवारातील नातेवाईक, आप्तेष्ट मंडळी उपस्थित होते.

Next Post
ईपीएफओ कार्यालयाचे ई-नोमिनिशनवर सेमिनार संपन्न

ईपीएफओ कार्यालयाचे ई-नोमिनिशनवर सेमिनार संपन्न

ताज्या बातम्या

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा

February 26, 2026
‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या
जळगाव जिल्हा

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

February 26, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group