जळगाव (प्रतिनिधी) : भडगाव तालुक्यातील वरखेडी रोड येथे दुचाकी अपघातात एक विवाहिता जबर जखमी झाली होती. उपचारादरम्यान विवाहितेचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कविता प्रकाश राठोड (वय २७, रा. आडगाव ता. एरंडोल) असे मयत विवाहितेचे नाव आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पती, १ मुलगा, १ मुलगी असा परिवार आहे. कविता यांचे पती प्रकाश हे हातमजुरी करून परिवाराचा उदरनिर्वाह करतात. दरम्यान, गुरुवारी दि. १३ मार्च रोजी कविता या त्यांचा भाऊ मच्छिन्द्र यांचेसह भडगाव येथून आडगाव येथे जाण्यासाठी दुचाकीवर निघाल्या होत्या.
वरखेडी गावाजवळ दुचाकी आली असता भीषण अपघात झाला. या अपघातात कविता यांच्या डोक्याला जबर मार लागला. तर भाऊ मछिंद्र हा देखील जखमी झाला होता. कविता राठोड यांना उपचारासाठी जळगाव तालुक्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. १२ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यावर अखेर त्यांची प्राणज्योत मालविली. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. घटनेबद्दल नशिराबाद पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.