• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कॉफीशॉपच्या नावाखाली आत मुलामुलींचे अश्लील चाळे ; पोलिसांची धाड

पाचोरा शहरातील प्रकार

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 26, 2025
in जळगाव जिल्हा
0
कॉफीशॉपच्या नावाखाली आत मुलामुलींचे अश्लील चाळे ; पोलिसांची धाड

पाचोरा, (प्रतिनिधी) : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील नवकार प्लाजा येथे एका बंद कॉफीशॉप मध्ये अश्लील चाळे करणाऱ्या प्रेमी युगुलांना पाचोरा पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धाड टाकून धडक कारवाई केली आहे. याप्रकरणी कॉफीशॉप चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाचोरा येथील नवकार प्लाजा येथे एक बंद असलेले कॉफीशॉप आहे. या कॉफीशॉप मध्ये कुठलेही पेय अथवा खाद्यपदार्थ विकले जात नाही. तसेच कॉफीशॉपचा परवाना देखील नाही. असे असताना मात्र तेथे संशयित आरोपी समाधान संजय भोई (वय २३, रा. बहिरम नगर, पाचोरा) याने काही तरुण तरुणींना अश्लील चाळे करण्यासाठी ४ कंपार्टमेंट उपलब्ध करून दिले होते. त्याने हा गाळा अजयसिंग राजपूत (रा. भडगाव) यांचेकडून भाडेतत्वावर घेतला आहे. याबाबतची कुणकुण पाचोरा पोलीस स्टेशनला लागताच त्यांनी मंगळवारी दि.२५ रोजी सकाळी साडे अकरा वाजता धाड टाकली.

पोलिसांनी पाहणी केली असता तेथे ४ कंपार्टमेंट येथे लाकडी टेबल, खुर्च्या टाकून व कापडी पडदे लावलेल्या स्थितीत दिसले. तेथे काही प्रेमी युगुल व महाविद्यालयाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी अश्लील चाळे करताना आढळून आले. मुलामुलींना समज देत सोडून देण्यात आले. पडदे, खुर्च्या अशा एकूण ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कारवाई निरीक्षक अशोक पवार यांचे मार्गदर्शनाखाली हेकॉ राहुल शिंपी, संदीप राजपूत, उपनिरीक्षक अशोक पाटील यांनी केली. तर कॉफीशॉप चालक समाधान संजय भोई या इसमाविरुद्ध कॉन्स्टेबल सागर पाटील यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास निरीक्षक अशोक पवार यांचे मार्गदर्शनाखाली कॉ. राहुल शिंपी करीत आहेत.

Next Post
शिक्षिकेच्या गळ्यातील सोन्याच्या मंगळसूत्राची धावत्या बस मधून चोरी

सुविधा केंद्रातुन २ लाखांची रोकड लांबवली ; सीसीटीव्ही फुटेजमध्ये घटना कैद

ताज्या बातम्या

काळ बनून आला डंपर! भाजी घेऊन घरी जाणाऱ्या मजुराचा जागीच मृत्यू
जळगाव जिल्हा

काळ बनून आला डंपर! भाजी घेऊन घरी जाणाऱ्या मजुराचा जागीच मृत्यू

February 14, 2026
जळगावच्या ‘आयटी एक्स्पो’मध्ये एआय तंत्रज्ञानाचे दर्शन; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते शानदार उद्घाटन
जळगाव जिल्हा

जळगावच्या ‘आयटी एक्स्पो’मध्ये एआय तंत्रज्ञानाचे दर्शन; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते शानदार उद्घाटन

February 13, 2026
सुरक्षेची नवी क्षितिजे! जळगाव जिल्हा माहिती तंत्रज्ञान संघटनेतर्फे भव्य ‘आयटी व सुरक्षा एक्स्पो २०२६’ ​
जळगाव जिल्हा

सुरक्षेची नवी क्षितिजे! जळगाव जिल्हा माहिती तंत्रज्ञान संघटनेतर्फे भव्य ‘आयटी व सुरक्षा एक्स्पो २०२६’ ​

February 12, 2026
गावठी कट्ट्यासह तरुणाला ठोकल्या बेड्या!; जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
गुन्हे

गावठी कट्ट्यासह तरुणाला ठोकल्या बेड्या!; जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

February 12, 2026
आ. एकनाथ खडसेंवर सावदा पोलिसात गुन्हा दाखल; पोलीस अधिकारी आणि मंत्र्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप
गुन्हे

आ. एकनाथ खडसेंवर सावदा पोलिसात गुन्हा दाखल; पोलीस अधिकारी आणि मंत्र्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप

February 12, 2026
अशोक जैन यांच्या वाढदिवसानिमित्त ‘जैन मॅडरिन-१’ या नवीन संत्रा वाणाचे लोकार्पण
कृषी

अशोक जैन यांच्या वाढदिवसानिमित्त ‘जैन मॅडरिन-१’ या नवीन संत्रा वाणाचे लोकार्पण

February 11, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group