• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

लाडके आई-आजोबा म्हणून वृद्धांना मदत करा – डॉ. अण्णासाहेब टेकाळे

ज्येष्ठ नागरिकांची कार्यशाळा कांताई सभागृह येथे संपन्न

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 23, 2025
in जळगाव जिल्हा
0
लाडके आई-आजोबा म्हणून वृद्धांना मदत करा – डॉ. अण्णासाहेब टेकाळे

जळगाव, (प्रतिनिधी) : सरकारने ज्याप्रमाणे लाडकी बहिण योजना आणली त्याप्रमाणे ज्येष्ठांसाठी लाडके आई-आजोबा म्हणून मदत केली पाहिजे. कुटुंब पद्धती ज्याप्रमाणे बदल आहे. त्याप्रमाणे समाजातील ज्येष्ठाविषयीचे आचरणही बदलत आहे. त्यामुळेच सरकारसोबत समाजातील प्रत्येक घटकाने वृद्धांविषयी आपली जबाबदारी व कर्तव्य ओळखली पाहिजेत, गाव तेथे ज्येष्ठ नागरिक महासंघ ही संकल्पना राबवून तेथील ज्येष्ठांना आर्थिक अनुदान दिले पाहिजे, रेल्वे मधील आरक्षणाची मागणीसाठी पाठपुरावा सुरू असुन ती पुर्णत्वास देण्यासाठी सकारात्मक प्रयत्न होत असल्याची माहिती महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष डॉ. अण्णासाहेब टेकाळे यांनी दिली.

जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. यांच्या सहकार्यातून माजी अध्यक्ष, खान्देश प्रादेशिक विभाग धुळे व ज्येष्ठ नागरिक संघ चैतन्य नगर जळगाव तर्फे आयोजित ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यशाळेत डॉ. अण्णासाहेब टेकाळे अध्यक्ष म्हणून बोलत होते. ही सभा कांताई सभागृह येथे संपन्न झाली. यावेळी व्यासपीठावर उद्घाटक म्हणून जैन इरिगेशनचे मिडीया विभागप्रमुख अनिल जोशी उपस्थित होते. प्रमुख वक्ते म्हणून महाराष्ट्र व गोवा राज्याचे बार कौन्सिल चे माजी अध्यक्ष ऍड. भरत देशमुख, ज्येष्ठ नागरिक महासंघाचे माजी अध्यक्ष डी. टी. चौधरी, अरूण रोडे, उपाध्यक्ष अंजुमन खान, माजी कार्यवाहक प्रकाश घादगिने, खान्देश प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष बी. एन. पाटील उपस्थित होते. त्यांच्यासोबत कार्यवाहक जगतराव पाटील, ऍड. प्रभाकर घुमासे, अरूण माळी, डॉ. एस. आर. पाटील, एस. बी. महाजन, रमेश जोगी, विजय करोडपती, बाळकृष्ण वाणी यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरवातीला खरा तो एकची धर्म… ही प्रार्थना बी. एन. पाटील यांनी म्हटली. राज्य गीत गर्जा महाराष्ट्र माझा.. हे स्वरवेध फाऊंडेशनचे भागवत पाटील सह कलावंतांनी सादर केले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करुन कार्यशाळेचे उद्घाटन झाले. जिल्हाभरातून ज्येष्ठ नागरीकांची लक्षणिय उपस्थिती होती. प्रास्ताविक डी. टी. चौधरी यांनी केले. प्रतिभा पाटील यांनी सुत्रसंचालन केले. शालिनी सोनवणे यांनी आभार मानले. यावल समाचार पत्रिकेचे प्रकाशन झाले यशस्वीतेसाठी विश्वासराव सोनवणे, प्रकाश नाईक, दिलीप बोरसे, के. डी. पाटील, विकास बोरोले यांच्यासह कार्यकारिणी मधील सदस्यांनी सहकार्य केले. पसायदाने समारोप झाला.

संघटनेची कार्यपद्धती, घटनेने कार्यकर्त्यांनी दिलेले अधिकारी, समाजसेवेसाठी असलेली जबाबदारी, आनंदी वृद्धत्व, ज्येष्ठांविषयी कायदे आणि त्याद्वारे मिळणारे संरक्षण, शासकीय योजनांविषयी माहिती यासह विविध विषयांवर कार्यशाळेत प्रकाश टाकण्यात आला.


 

Next Post
पतीनेच पत्नीची गळा आवळून केली हत्या ; भुसावळ तालुक्यातील घटना

पतीनेच पत्नीची गळा आवळून केली हत्या ; भुसावळ तालुक्यातील घटना

ताज्या बातम्या

‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघा’तर्फे अभिवादन
जळगाव जिल्हा

‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघा’तर्फे अभिवादन

February 20, 2026
भुसावळात श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी
जळगाव जिल्हा

भुसावळात श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी

February 20, 2026
पिंपळगाव खुर्दमध्ये माकडाचा थरार; १५ दिवसांत ३५ जण जखमी, ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण
जळगाव जिल्हा

पिंपळगाव खुर्दमध्ये माकडाचा थरार; १५ दिवसांत ३५ जण जखमी, ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण

February 20, 2026
गर्जना ग्रामीण पत्रकार संघातर्फे जळगावात शिवजयंती उत्साहात साजरी
जळगाव जिल्हा

गर्जना ग्रामीण पत्रकार संघातर्फे जळगावात शिवजयंती उत्साहात साजरी

February 19, 2026
संत ज्ञानेश्वर विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी; शिवरायांच्या विचारांचा वारसा जोपासण्याचे आवाहन
जळगाव जिल्हा

संत ज्ञानेश्वर विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी; शिवरायांच्या विचारांचा वारसा जोपासण्याचे आवाहन

February 19, 2026
अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत रेल्वे कर्मचाऱ्याची फसवणूक; चौघांवर गुन्हा दाखल
गुन्हे

अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत रेल्वे कर्मचाऱ्याची फसवणूक; चौघांवर गुन्हा दाखल

February 19, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group