जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील खुपचंद सागरमल विद्यालयात जागतिक वन दिवस साजरा करण्यात आला. यावेळी पर्यावरण सल्लागार राजेद्र राणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी सकारात्मक आणि कृतीशिल जनजागृती करण्याबाबत वर्षभर केलेल्या प्रयत्नांचा उत्कर्षबिंदु म्हणुन २१ मार्च रोजी जागतिक वनदिवस दरवर्षी संपुर्ण जगात साजरा करण्यात येतो.
या दिवसाचे महत्व समजुन विदयार्थांमध्ये पर्यावरण विषयक जनजागृती व्हावी या उद्देशाने खुबचंद सागरमल विद्यालयात जागतिक वन दिवसानिमित्त विदयार्थांना सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा जैन उद्योग समूहाचे पर्यावरण सल्लागार राजेद्र राणे यांनी वनांचे महत्व सांगुन वन वाचवण्यासाठी करावयाचे प्रयत्न, पर्यावरण समतोल राखण्यासाठी सर्वानी हातभार लावणे आवश्यक असुन मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करुन जमिनीत पाणी जिरवणे किती महत्वाचे आहे या बाबत सखोल मार्गदर्शन केले
या प्रसंगी पर्यवेक्षक सुरेश आदिवाल, हरित सेना प्रमुख प्रविण पाटील, योगेद्र पवार, कल्पना देवरे, मंगला सपकाळे, अजय पाटील, संजय पाटील आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.