• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शेतकऱ्यांसाठी बँकांनी कर्ज सुविधा उपलब्ध करून द्यावी.. -जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

जळगाव जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या बैठकीत वित्तीय समावेशनासंदर्भात चर्चा

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 20, 2025
in जळगाव जिल्हा
0
शेतकऱ्यांसाठी बँकांनी कर्ज सुविधा उपलब्ध करून द्यावी.. -जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

जळगाव, (प्रतिनिधी) : जिल्हा अग्रणी बँक, जळगाव यांच्या वतीने जिल्हा स्तरीय सल्लागार समिती आणि जिल्हास्तरीय पुनरावलोकन समिती यांची बैठक नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात संपन्न झाली. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद होते तर बैठक संयोजन अग्रणी जिल्हा व्यवस्थापक प्रणव कुमार झा यांनी केले.

या बैठकीत जिल्ह्यातील विविध बँकांच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला. तसेच प्रधानमंत्री रोजगार सृजन कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार सृजन कार्यक्रम, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना आणि प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी यांनी कर्ज ठेव गुणोत्तर, किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत कर्ज वाटप, सूक्ष्म व लघु उद्योगांना दिले जाणारे कर्ज, शैक्षणिक कर्जे आणि महामंडळांना दिल्या जाणाऱ्या कर्जांच्या स्थितीची तपासणी केली.

जिल्हाधिकाऱ्यांनी प्राधान्य क्षेत्र कर्ज आणि एमएसएमई क्षेत्रातील कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यावर भर देण्याच्या सूचना बँकांना दिल्या. तसेच, आदिवासी भागात बँकिंग सेवा वाढवण्यावर विशेष लक्ष द्यावे असे निर्देश त्यांनी दिले. जामनेर येथे सुमारे २ हजार फार्म पाँड (शेतीसाठी तलाव) प्रकल्प सुरू असून, त्यासाठी बँकांनी कर्ज सुविधा उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून शेतकऱ्यांना फायदा होईल आणि बँकांचे कर्ज पोर्टफोलिओही सुधारेल, असे त्यांनी सांगितले.

या बैठकीत जिल्हा विकास व्यवस्थापक अमित तायडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, जिल्हा उप वनसंरक्षक जमीर एम. शेख, प्रकल्प विकासक आर. एस. लोखंडे, संचालक सुमित कुमार झा आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे मुख्य व्यवस्थापक अभिषेक नंदेश्वर उपस्थित होते.

या बैठकी दरम्यान बँकांना सीडी रेशो सुधारण्यास, किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत जास्तीत जास्त कर्ज वितरीत करण्यास, अधिक कर्ज उपलब्ध करून देण्यास, शैक्षणिक कर्जांची उपलब्धता वाढविण्यास आणि महामंडळांना अधिक कर्ज देण्यास निर्देश देण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी बँकांना शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सहकार्य करण्याचे आणि जिल्ह्यात वित्तीय समावेशनाला गती देण्याचे आवाहन केले.

 


 

Next Post
शिक्षिकेच्या गळ्यातील सोन्याच्या मंगळसूत्राची धावत्या बस मधून चोरी

रिक्षातून जाताना महिलेच्या पिशवीतील ३५ हजार रूपये लंपास ; अमळनेर शहरातील घटना

ताज्या बातम्या

प्रकाश तेली यांच्या ‘शाश्वत विचार’ ग्रंथाचे पद्मश्री चैत्राम पवार यांच्या हस्ते प्रकाशन
जळगाव जिल्हा

प्रकाश तेली यांच्या ‘शाश्वत विचार’ ग्रंथाचे पद्मश्री चैत्राम पवार यांच्या हस्ते प्रकाशन

March 14, 2026
कामचुकारपणा आणि गैरप्रकार खपवून घेणार नाही; उपमहापौरांचा आरोग्य विभागाला सज्जड इशारा!
जळगाव जिल्हा

कामचुकारपणा आणि गैरप्रकार खपवून घेणार नाही; उपमहापौरांचा आरोग्य विभागाला सज्जड इशारा!

March 14, 2026
अल्पवयीन मुलीचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन विनयभंग; ‘पोक्सो’अंतर्गत कारवाई
गुन्हे

अल्पवयीन मुलीचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन विनयभंग; ‘पोक्सो’अंतर्गत कारवाई

March 14, 2026
जळगाव जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये १४ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालत
जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये १४ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालत

March 13, 2026
नितीन पाटील यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची ‘पीएच.डी.’
खान्देश

नितीन पाटील यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची ‘पीएच.डी.’

March 13, 2026
महाराष्ट्रावर अवकाळीचे सावट: पुढील पाच दिवस ढगाळ हवामान, तर काही जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
जळगाव जिल्हा

महाराष्ट्रावर अवकाळीचे सावट: पुढील पाच दिवस ढगाळ हवामान, तर काही जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा

March 13, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group