• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कृषी विभागातर्फे आज जळगावला कार्यशाळा

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 17, 2021
in कृषी
0
कृषी विभागातर्फे आज जळगावला कार्यशाळा

जळगाव, दि. 17 (जिमाका) – कृषी विभाग, जळगाव, कृषि विज्ञान केंद्र, ममुराबाद व पाल ( रावेर) यांचे संयुक्त विद्यमाने एक दिवसीय रब्बी पूर्व हंगामी हरभरा व कांदा उत्पादन तंत्रज्ञान कार्यशाळा- 2021 चे आयोजन बुधवार 17 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 10 वाजता नियोजन भवन, जळगाव येथे करण्यात येणार आहे. या कार्याशाळेत हरभरा, कांदा व गहू पिकाचे उत्पादन तंत्रज्ञान, बीबीएफ यंत्राव्दारे हरभरा लागवड, किडरोग एकात्मिक व्यवस्थापन, बियाणे उत्पादन कार्यक्रम व प्रमाणिकरण व इतर अनुषंगिक घटकांबाबत माहिती देण्यात येणार आहे.

हरभरा व कांदा पिकांबाबत डॉ.एन.एस. कुटे, कडधान्य पैदासकर, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, डॉ. दत्तात्रय वने, प्रगतीशील शेतकरी, राहुरी, डॉ. हेमंत बाहेती, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा कार्यक्रम समन्वयक, कृषि विज्ञान केंद्र, ममुराबाद, वैभव शिंदे, विषय विशेषज्ञ, कृषि विज्ञान केंद्र, ममुराबाद, हितेंद्र सोनवणे, विभागीय बीज प्रमाणिकरण अधिकारी, जळगाव तसेच गहु पिकाबाबत प्रा.अतुल पाटील, विषय विशेषज्ञ, कृषि विज्ञान केंद्र, पाल (रावेर) व संभाजी ठाकूर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

या कार्यशाळेचे प्रसारण ऑनलाईन प्रणालीव्दारा यु-टयुब चॅनल वर https://youtu.be/tLv६JcUeL८s या लिंकव्दारे सुध्दा करण्यात येणार आहे. जिल्हयातील जास्तीतजास्त शेतकरी बांधवांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर व कृषि उपसंचालक अनिल भोकरे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Next Post
बहुजन समाज पार्टीच्या जळगाव शहर विधानसभा क्षेत्राची कार्यकारणी जाहीर

बहुजन समाज पार्टीच्या जळगाव शहर विधानसभा क्षेत्राची कार्यकारणी जाहीर

ताज्या बातम्या

लाचखोर पोलीस नाईक बडतर्फ; शनिपेठ पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी नियंत्रण कक्षात रवानगी
गुन्हे

लाचखोर पोलीस नाईक बडतर्फ; शनिपेठ पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी नियंत्रण कक्षात रवानगी

April 17, 2026
जळगाव क्रिकेट लीग: जर्सी अनावरण आणि जल्लोषमय वातावरणात भव्य रॅली संपन्न
क्रिडा

जळगाव क्रिकेट लीग: जर्सी अनावरण आणि जल्लोषमय वातावरणात भव्य रॅली संपन्न

April 16, 2026
जळगावात अभाविपचा सामाजिक उपक्रम; डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त २५०० नागरिकांना शीतपेय वाटप
जळगाव जिल्हा

जळगावात अभाविपचा सामाजिक उपक्रम; डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त २५०० नागरिकांना शीतपेय वाटप

April 16, 2026
जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा ‘रेड अलर्ट’; जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे निर्देश
जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा ‘रेड अलर्ट’; जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे निर्देश

April 16, 2026
जैन इरिगेशनमध्ये अग्निशमन सेवा सप्ताह साजरा
जळगाव जिल्हा

जैन इरिगेशनमध्ये अग्निशमन सेवा सप्ताह साजरा

April 16, 2026
आईला जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधम जेरबंद
गुन्हे

आईला जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधम जेरबंद

April 16, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group