जळगाव, (प्रतिनिधी) : एमआयडीसी पोलीस स्टेशन परीसरातील कंजरवाडा, तांबापुर, शिरसोली परीसरात मोहीम राबवुन दारुचे भट्टया पोलिसांनी उध्वस्त करुन २७ ईसमांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांनी सण उत्सव दरम्यान काही टवाळखोर लोक दारु पिवुन उपद्रव निर्माण करुन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत असतात. तरी अवैध दारु विक्रि व तयार करणारे ईसमांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते. त्याअनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, पोलीस निरीक्षक संदीप पाटील तसेच एमआयडीसी पोलीस स्टेशन, रामानंद, जिल्हापेठ, शनीपेठ, जळगाव शहर पोस्टे, आर. सी. पी, क्युआरटी पथकाने जळगाव शहरातील कंजरवाडा तसेच ग्रामीण भागातील शिरसोली प्र बो, प्र नं या ठिकाणी कोबींग ऑपरेशन राबवुन अवैधरीत्या दारु विक्री करणा-या तसेच गावठी हातभट्टी दारु तयार करणा-या ठिकाणांचा पहाटे शोध घेतला.
त्याठिकाणी २७ लोकांवर छापेमारी करुन एकुण त्यांचेकडुन १० हजार १५ लीटर दारु बनविण्याकरीता लागणारे रसायन, मुद्देमाल असा एकुण ७ लाख १ हजार ६२० रुपये किंमतीची गावठी हातभट्टी दारु जप्त करुन नष्ट करण्यात आली आहे. सदर संशयित आरोपीतांना ताब्यात घेवुन त्यांच्यावर मुंबई दारुबंदी कायदा कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कोंबींग ऑपरेशन दरम्यान एकुण ११ अधिकारी, ४८ पोलीस अंमलदार, व २२ होमगार्ड, आरसीपीक्युआरटी पथकाचा सहभाग होता.