• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

सराईत दागिने चोरट्या ‘गंगा’ पावणे ८ लाखांचा मुद्देमालसह अटकेत

राज्यभरात ९ दिवस पाठलाग करत केली अमळनेर पोलिसांनी कारवाई

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 18, 2025
in जळगाव जिल्हा
0
सराईत दागिने चोरट्या ‘गंगा’ पावणे ८ लाखांचा मुद्देमालसह अटकेत

अमळनेर, (प्रतिनिधी) : शहरातील बसमधून महिलेचे दागिने लंपास करणाऱ्या चोरट्या महिलांची पोलिसांनी अमरावती जिल्ह्यातून धरपकड करून अटक केली आहे. या महिला राज्यभरातील विविध जिल्ह्यात तसेच मध्य प्रदेशमध्ये चोरी करण्यात पटाईत असल्याचे दिसून आले आहे. त्यांच्याकडून ७ लाख ८० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

प्रतिभा जिजाबराव पाटील (वय ४८, रा. गारखेडे ता. धरणगाव) या दि.६ मार्च रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास धरणगाव येथून जळगाव ते दोंडाईचा बसमध्ये बसल्या होत्या. वाघोदे ता. शिंदखेडा येथे नातेवाईकांच्या लग्नसमारंभात त्या जात होत्या. त्यांच्या जवळील सोन्याचे दागिने, बांगड्या व मंगलपोत असे बॅग मध्ये ठेवले होते. त्यांच्या शेजारी दोन महिला बसलेल्या होत्या. त्या अर्ध्या रस्त्यात उतरल्या. काही वेळाने प्रतिभा पाटील यांनी पर्स चेक केली असता त्यांना दागिने मिळून आले नाही. त्यामुळे अमळनेर पोलीस स्टेशनला त्यांनी तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास सुरू होता.

अमळनेर पोलिसांच्या पथकाने गोपनीय माहितीवरून व तांत्रिक विश्लेषणावरून सदर चोरट्यांचा माग घेतला. सुमारे ८ ते ९ दिवस चोर पोलिसांचा खेळ करीत चोरट्यांना शोधण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान चोरट्यांनी त्यांचे वास्तव्याचे ठिकाण जळगाव, अकोला, बार्शीटाकळी, परतवाडा, मध्य प्रदेश राज्यातील तिगाव, पांडुरना, इंदोर असे बदलले होते. मात्र पोलिसांनी त्यांच्यापुढे एक पाऊल टाकत त्यांच्या प्रत्येक वास्तव्याची माहिती घेतली होती. अखेर त्यांना अमरावती जिल्ह्यातील वरुड येथे आठवडे बाजार भागात फिरत असताना ताब्यात घेत अटक केली आहे.

गंगा चैना हातगळे (वय ४०) आणि गंगा सुभाष नाडे (वय ४५, दोन्ही रा. नेताजी नगर, यवतमाळ) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. दोन्ही महिला संशयित आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून ४ तोळे वजनाच्या ३ लाख ६० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या २ बांगड्या आणि ५ तोळे वजनाची ४ लाख २० हजार रुपयांची सोन्याची मंगलपोत असा ७ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नामदेव बोरकर, हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार, विनोद संदांशिव, प्रशांत पाटील, निलेश मोरे, उज्वल कुमार म्हस्के, अमोल पाटील, गणेश पाटील, महिला होमगार्ड नीलिमा पाटील यांचेसह नेत्रम कार्यालय, जळगाव येथील कॉन्स्टेबल पंकज खडसे, कुंदन सिंग बयस, गौरव पाटील, मिलिंद जाधव यांनी केली आहे. तपास उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहेत.

 


Next Post
तांबापुरा, शिरसोलीत दारूच्या भट्ट्या उध्वस्त ; २७ संशयित ताब्यात

तांबापुरा, शिरसोलीत दारूच्या भट्ट्या उध्वस्त ; २७ संशयित ताब्यात

ताज्या बातम्या

आयटीसी संगीत रिसर्च अकादमीच्या संगीत महोत्सवाचे जळगावात आयोजन
खान्देश

आयटीसी संगीत रिसर्च अकादमीच्या संगीत महोत्सवाचे जळगावात आयोजन

October 28, 2025
सोने-चांदीच्या दरात विक्रमी घसरण; ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण
जळगाव जिल्हा

सोने-चांदीच्या दरात विक्रमी घसरण; ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण

October 28, 2025
स्वर्गीय मित्राच्या आठवणीत जीपीएस गृपने दत्तक घेतली पाळधीतील स्मशानभूमी
जळगाव जिल्हा

स्वर्गीय मित्राच्या आठवणीत जीपीएस गृपने दत्तक घेतली पाळधीतील स्मशानभूमी

October 28, 2025
जळगावच्या देवयानी पाटीलची रत्नागिरीत चमकदार कामगिरी! तायक्वांडो अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक
क्रिडा

जळगावच्या देवयानी पाटीलची रत्नागिरीत चमकदार कामगिरी! तायक्वांडो अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक

October 28, 2025
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या बंगल्यावर चोरट्यांचा डल्ला; ९ तोळे सोने, रोख रकमेसह ऐवज लंपास
खान्देश

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या बंगल्यावर चोरट्यांचा डल्ला; ९ तोळे सोने, रोख रकमेसह ऐवज लंपास

October 28, 2025
हद्दपार गुन्हेगार, साथीदार गावठी कट्टा व कोयत्यासह जेरबंद!
खान्देश

हद्दपार गुन्हेगार, साथीदार गावठी कट्टा व कोयत्यासह जेरबंद!

October 27, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group