• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शहिद जवान चेतन चौधरीवर चोपड्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

बीएसएफ जवानांसह पोलीस दलाकडून मानवंदना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 18, 2025
in जळगाव जिल्हा
0
शहिद जवान चेतन चौधरीवर चोपड्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

चोपडा, (प्रतिनिधी) : येथील गुजरअळी भागातील जवान चेतन पांडुरंग चौधरी मणिपूर राज्यातील बस अपघातात शहिद झाल्यामुळे जळगाव जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. सोमवारी दि. १७ रोजी त्यांना शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी बीएसएफ जवानांसह जिल्हा पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली.

मणिपूर राज्यात झालेल्या बस अपघातात ३ जवान शहिद झाले आहेत. यात चेतन चौधरी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यांचे पार्थिव चोपड्यात आणल्यानंतर शिरपूरकडून येत असताना चोपडा येथील प्रताप विद्यामंदिर कस्तुबा माध्यमिक विद्यालय या शाळेतील विद्यार्थ्यांनी शहीद जवानाच्या पथि॔ववर पुष्पवृष्टी केले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात शहीद जवानचे पार्थिव नागरिकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आले. राहत्या घरी मुखदर्शनासाठी शहीद जवानाचे पार्थिव परिवाराला देण्यात आले.

जळगाव पोलीस दलातर्फे सलामी घेऊन सजवलेला ट्रॅक्टरवरती शहीद जवानांच्या पार्थिव व परिवारासह पत्नी, दोन्ही मुलं, आई वडील, भाऊ व नातेवाईक सोबत होते. शहीद जवानांच्या रॅलीत दोनशे फूट तिरंगा होता. ‘शहीद जवान अमर रहे, अमर रहे’च्या घोषणा देत महिलांसह ध्वज घेऊन चालत होते. रॅली, मार्गात घरापासून ठीकठिकाणी शहीद जवानावरती पुष्पदृष्टी करण्यात येत होती.

Next Post
सराईत दागिने चोरट्या ‘गंगा’ पावणे ८ लाखांचा मुद्देमालसह अटकेत

सराईत दागिने चोरट्या 'गंगा' पावणे ८ लाखांचा मुद्देमालसह अटकेत

ताज्या बातम्या

‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघा’तर्फे अभिवादन
जळगाव जिल्हा

‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघा’तर्फे अभिवादन

February 20, 2026
भुसावळात श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी
जळगाव जिल्हा

भुसावळात श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी

February 20, 2026
पिंपळगाव खुर्दमध्ये माकडाचा थरार; १५ दिवसांत ३५ जण जखमी, ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण
जळगाव जिल्हा

पिंपळगाव खुर्दमध्ये माकडाचा थरार; १५ दिवसांत ३५ जण जखमी, ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण

February 20, 2026
गर्जना ग्रामीण पत्रकार संघातर्फे जळगावात शिवजयंती उत्साहात साजरी
जळगाव जिल्हा

गर्जना ग्रामीण पत्रकार संघातर्फे जळगावात शिवजयंती उत्साहात साजरी

February 19, 2026
संत ज्ञानेश्वर विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी; शिवरायांच्या विचारांचा वारसा जोपासण्याचे आवाहन
जळगाव जिल्हा

संत ज्ञानेश्वर विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी; शिवरायांच्या विचारांचा वारसा जोपासण्याचे आवाहन

February 19, 2026
अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत रेल्वे कर्मचाऱ्याची फसवणूक; चौघांवर गुन्हा दाखल
गुन्हे

अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत रेल्वे कर्मचाऱ्याची फसवणूक; चौघांवर गुन्हा दाखल

February 19, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group