• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

वीरजवान मंगलसिंह परदेशी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 17, 2021
in जळगाव जिल्हा
0
वीरजवान मंगलसिंह परदेशी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

जळगाव, दि. 17 (जिमाका) – सावखेडा बु., ता. पाचोरा येथील वीरजवान मंगलसिंह जयसिंह परदेशी (वय 35) यांच्या पार्थिवावर आज सकाळी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, राज्याचे जलसंपदा लाभक्षेत्र, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागास बहुजन कल्याण, कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी परदेशी कुटुंबायांची घरी जाऊन भेट घेत त्यांचे सांत्वन केले.

जवान मंगलसिंह परदेशी यांना 14 नोव्हेंबर, 2021 रोजी पठाणकोट येथे कर्तव्यावर असताना छातीत गोळी लागल्याने वीरमरण आले. त्यांचे पार्थिव आज सकाळी सावखेडा येथे आणण्यात आले. त्यानंतर शोकाकूल वातावरणात आणि ‘जवान मंगलसिंह अमर रहे’च्या जयघोषात अंत्ययात्रा काढण्यात आली.
जवान मंगलसिंग परदेशी यांना त्यांचा सहावीतील 12 वर्षीय मुलगा चंदन याने अग्निडाग दिला. पिंपळगाव (हरे.) येथील पोलीसांनी बंदुकीच्या तीन फैरीची सलामी दिली. जवान मंगलसिंह यांच्यामागे आई-वडील, पत्नी किरण, मुलगा चंदन, मुली चंचल व कांचन असा परिवार आहे.

जवान मंगलसिंग परदेशी यांना सुमारे 14 वर्षे सेवा केल्यानंतर नाईक पदावर पदोन्नती झाल्याने तीन वर्षं सेवेचे वाढवून मिळाले होते. सेवानिवृत्त होण्यासाठी सहा महिने बाकी होते. जवान मंगलसिंग परदेशी यांच्या पार्थिवाचे आमदार किशोर पाटील, उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, पोलिस उपअधीक्षक भारत काकडे, गटविकास अधिकारी अतुल पाटील, निवासी नायब तहसीलदार संभाजी पाटील, जिल्हा सैनिक कार्यालयाचे वेल्फेअर अधिकारी अनुरथ वाकडे, जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील, दिपकसिंग राजपूत, मधुकर काटे, सेवानिवृत्त सैनिक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष बाळु पाटील यांच्यासह विविध राजकीय पक्ष, संघटनांचे पदाधिकारी यांनी पुष्पचक्र अर्पण करून अंत्यदर्शन घेतले. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Next Post
कृषी विभागातर्फे आज जळगावला कार्यशाळा

कृषी विभागातर्फे आज जळगावला कार्यशाळा

ताज्या बातम्या

आर.आर. विद्यालयात विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ: मारहाणीचा नातेवाईकांचा आरोप
जळगाव जिल्हा

आर.आर. विद्यालयात विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ: मारहाणीचा नातेवाईकांचा आरोप

July 12, 2025
जळगावातील नामांकित हॉटेलमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, १९.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

जळगावातील नामांकित हॉटेलमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, १९.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 12, 2025
जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य केंद्रांचा गौरव
जळगाव जिल्हा

जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य केंद्रांचा गौरव

July 11, 2025
पाडळसरे येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
जळगाव जिल्हा

पाडळसरे येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

July 11, 2025
मुलांनी केले आई-वडिलांचे पाद्यपूजन, व्यक्त केली कृतज्ञता
जळगाव जिल्हा

मुलांनी केले आई-वडिलांचे पाद्यपूजन, व्यक्त केली कृतज्ञता

July 11, 2025
जिल्ह्यात हातभट्टी दारूविरुद्ध मोठी कारवाई: १४ लाखांचा मुद्देमाल जप्त; १३४ गुन्हे दाखल
गुन्हे

जिल्ह्यात हातभट्टी दारूविरुद्ध मोठी कारवाई: १४ लाखांचा मुद्देमाल जप्त; १३४ गुन्हे दाखल

July 11, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group