• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

‘टेन्शन विरूद्ध मेडिटेशन’ वर प.पू. श्री प्रविणऋषीजी म.सा. यांचे मार्गदर्शन

कार्यक्रमात हजारो जळगावकरांचा सहभाग

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 9, 2025
in धार्मिक
0
‘टेन्शन विरूद्ध मेडिटेशन’ वर प.पू. श्री प्रविणऋषीजी म.सा. यांचे मार्गदर्शन

जळगाव, (प्रतिनिधी) : स्वत:च्या उणिवा बघत तक्रार करणे म्हणजे ध्यानसाधना सुरू झाल्याचे समजावे. मात्र आपण दुसऱ्यांच्याच उणिवा शोधत फिरतो आणि आपली ऊर्जा घालविता. पायात काटा गेला तर त्याच्या वेदना तुम्हांला जाणवतील तसे कोणाला दु:ख दिले तर तेही बोचते ते दूर केल्याशिवाय समोरच्याला मन:शांती लाभू शकत नाही. जेव्हा केव्हा विपरित परिस्थिती डोके वर काढेल तेव्हा अर्हम् धून च्या लयीने ध्यान साधना केली तर त्याची स्पंदनं तुम्हांला शांतीच्या महासागरात घेऊन जातील. तुमचं मन हेच शांतीचं केंद्र बिंदू आहे. हे नेहमीसाठी लक्षात ठेवा. तुमचं घर मंदिर आहे. मात्र त्याची आत्मा तुमच्या हृदयामध्ये विराजमान आहे.

बाहेरच्या मंदिरात केवळ मूर्ती मिळू शकते पण आपल्या आंतरआत्मात समावलेली परात्माची शक्ती आपण ध्यानाच्या माध्यमातून निश्चित अनभवू शकतो. कुठलेही तंत्रज्ञान आपल्याला त्रासिक वाटत असेल तर ते व्यर्थ आहे. टेन्शन फ्री होण्याच विचार करून नका, त्याच तणावाला आपले पॉवर हाऊस बनवा आणि मग बघा की तुमचे स्वचिंतन टेंन्शन व डिप्रेशनला कसे पळविते. बुद्धिचा उपयोग केला तर तुम्हाला कुणीही ‘बुद्ध’ होण्यापासून रोखू शकत नाही. टाईम मॅनेजमेंट तुम्ही खूप केले ह्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे सेल्फ मॅनेजमेंट आहे व ते जीवनात खूप उपयोगी पडू शकेल. वेळेला नियंत्रण करू शकता मात्र आत्मनियंत्रण महत्त्वाचे आहे. युद्धभूमीतही श्रीकृष्ण हसत प्रवेश करित मात्र आम्ही मानव घरात प्रवेश करताना तोंड उतरवून का जातो हे बदलले पाहिजे. असे उपाध्याय प.पू. श्री प्रविणऋषीजी म. सा. यांनी  ‘टेन्शन विरूद्ध मेडिटेशन’ वर मार्गदर्शन करताना सांगितले.

सुरवातीला प.पू. श्री. तीर्थेशऋषीजी म.सा. यांनी ‘पाना नहीं जीवन.. करना है साधना..’ हे सुंदर भजन सादर केले. छत्रपती संभाजीराजे नाट्यमंदिर येथे ‘टेन्शन विरूद्ध मेडिटेशन’ हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. सकल जैन श्री संघ, श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ, सर्व रोटरी क्लब जळगाव परिसर, सर्व लायन्स क्लब परिवार, भारत विकास परिषद जळगाव, केशवस्मृती प्रतिष्ठान जळगाव यांनी आयोजिलेल्या कार्यक्रमात हजारो जळगावकरांनी सहभाग घेतला. जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. चे सहकारी मोठ्या संख्येने कार्यक्रमात सहभागी झाले. सुरवातीला नवकार मंगलाचरण रेवती चतूर व सदस्य यांनी म्हटले. प्रास्ताविक नंदलाल गादिया यांनी केले. सपना छोरिया यांनी सुत्रसंचालन केले व आभार मानले. अर्हम विज्जा या प्रकल्पाची माहिती किरण गांधी यांनी दिली. पसायदान व मांगलिकने कार्यक्रमाचा समारोप झाला.

Next Post
मामाकडून भाचीवर प्राणघातक हल्ला, प्रेमविवाह केल्याच्या राग

मामाकडून भाचीवर प्राणघातक हल्ला, प्रेमविवाह केल्याच्या राग

ताज्या बातम्या

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश
खान्देश

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश

October 14, 2025
मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श
कृषी

मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श

October 14, 2025
जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा’ने सन्मानित
खान्देश

जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा’ने सन्मानित

October 14, 2025
अवैध गांजा वाहतुक करणारे दोन तस्कर जेरबंद!; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
खान्देश

अवैध गांजा वाहतुक करणारे दोन तस्कर जेरबंद!; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

October 14, 2025
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; वाळू डंपर सुरू ठेवण्यासाठी लाच स्वीकारताना ‘पंटर’ गजाआड
खान्देश

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; वाळू डंपर सुरू ठेवण्यासाठी लाच स्वीकारताना ‘पंटर’ गजाआड

October 14, 2025
पूरग्रस्त ५१ शेतकऱ्यांना भरारी, कृषीसम्राट फाउंडेशनतर्फे बियाणे, खते व फराळाचे वाटप
कृषी

पूरग्रस्त ५१ शेतकऱ्यांना भरारी, कृषीसम्राट फाउंडेशनतर्फे बियाणे, खते व फराळाचे वाटप

October 13, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group