• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मामाकडून भाचीवर प्राणघातक हल्ला, प्रेमविवाह केल्याच्या राग

यावल तालुक्यातील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 9, 2025
in गुन्हे
0
मामाकडून भाचीवर प्राणघातक हल्ला, प्रेमविवाह केल्याच्या राग

यावल, (प्रतिनिधी) : तालुक्यातील पिंप्री येथे सख्ख्या मामाने भाचीवर प्रेम प्रकरणातून केळी कापण्याच्या बक्खी या हत्याराने प्राणघातक हल्ला चढवला. तिच्या गळ्यावर वार केला असून तरुणीची प्रकृती गंभीर आहे. तिला वाचवणाऱ्या तिच्या नणंदेलादेखील दुखापत झाली. शनिवारी महिला दिनाच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यचे काम सुरू आहे.

वैष्णवी विनोद तायडे (वय १८, रा. उल्हासनगर) या तरुणीने पाडळसे येथील रहिवासी तरुणासोबत पळून जात लग्न केले व ती नंदोईच्या घरी आली. याची माहिती पाडळसेतील रहिवासी तिचा मामा उमाकांत चिंधू कोळी याला मिळाली. शनिवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास तो पिंप्री येथे दाखल झाला व त्याने भाची वैष्णवी हिच्यावर थेट केळी कापणीचा विळा, बक्खीने वार केला.

तिला वाचवण्याकरिता तिची नणंद वैशाली सपकाळे (वय २७) ही धावून आली. तिलादेखील हाताला व डोक्याला दुखापत झाली. वैष्णवी ही उमाकांत कोळी यांच्याकडे लहानाची मोठी झाली व तिने प्रेमविवाह केल्याचा राग उमाकांत याला आल्याने त्याने हे कृत्य केले. नागरिकांनी उमाकांतच्या तावडीतून दोन्ही महिलांना सोडविले व त्यास चोप देत पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. जखमी तरुणीवर व वैशाली सपकाळेवर यावल ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले.

वैष्णवीची तब्येत गंभीर असल्याने तिला जळगाव येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलवण्यात आले. याबाबत यावल पोलिसात रात्री उशिरापर्यंत फिर्याद नोंदवण्याचे काम सुरू होते. ऐन महिला दिनाच्या दिवशीच ही घटना घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली. पाडळसे गावातील तरुण व मामाकडे पाडळसे येथे शिक्षणासाठी आलेल्या या तरुणीचे प्रेमसुत जुळल्यानंतर त्यांनी लग्न केल्याची माहिती आहे.

Next Post
बसमधून महिलेचे साडेतीन लाखांचे दागिने लंपास

बसमधून महिलेचे साडेतीन लाखांचे दागिने लंपास

ताज्या बातम्या

एसीबी धडक कारवाई; महावितरणचा अभियंता २ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडला
गुन्हे

एसीबी धडक कारवाई; महावितरणचा अभियंता २ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडला

July 22, 2026
चिकूचे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नशिराबाद पोलिसांकडून आरोपीला बेड्या
गुन्हे

चिकूचे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नशिराबाद पोलिसांकडून आरोपीला बेड्या

July 22, 2026
डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान
आरोग्य

डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

July 22, 2026
कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन
क्रिडा

कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन

July 22, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन
आरोग्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन

July 22, 2026
अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश

July 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add