• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगावच्या विमानतळ विस्तारीकरणाला हिरवा कंदील !

शासनाकडून ३७ कोटीचे सहायक अनूदान मंजूर तर ५.२० हेक्टर जमीन भूसंपादनाला मान्यता

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 1, 2025
in जळगाव जिल्हा
0
जळगावच्या विमानतळ विस्तारीकरणाला हिरवा कंदील !

जळगाव, (विशेष प्रतिनिधी) : येथील प्रशस्त जळगाव विमानतळ विस्तारीकरणासाठी ५.२० हेक्टर आर जमिनीचे भूसंपादन करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने शासनाकडे सादर केला होता. शासनाने या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता दिली असून विमानतळ विस्तारीकरणाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. याबाबतचे परिपत्रक शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने जारी केले आहे.

जळगाव विमानतळाची मूळ जमीन ४१ हेक्टर होती. त्यामुळे विमानतळ विस्तारीकरणासाठी मौजे कुसुंबा आणि मौजे नशिराबाद येथील २५० हेक्टर आर जमीन संपादीत करण्यास महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला मान्यता देण्यात आली होती. मात्र सदर कंपनीने २६२. ५९ हेक्टर आर जमीन संपादित केली. शासनाची मान्यता न घेता संपादित करण्यात आलेली अतिरिक्त १२.५९ हेक्टर आर क्षेत्रास कार्यात्तर मान्यता देणे आणि विमानतळ विस्तारीकरणासाठी ५.२० हे. आर इतके क्षेत्र संपादित करणे आणि हे क्षेत्र भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाकडे हस्तांतरीत करण्यास मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने शासनाकडे पाठविला होता.

या प्रस्तावाला शक्ती प्रदत्त समितीने प्रशासकीय मान्यता दिली आहे. तसेच नव्याने संपादित करण्यात येणार्‍या ५.२० हे. आर क्षेत्रापैकी १.३९ हे. आर इतकी शासकीय जमीन विना मोबदला अथवा नाममात्र १ रू. दराने जिल्हाधिकार्‍याकडून विमानतळ विकास कंपनीकडे हस्तांतरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. विमानतळ विस्तारीकरणासाठी खासगी जमीन संपादित करण्यासाठी ३७.५० कोटी रूपयांचे सहायक अनुदान मंजूर करण्यात आले आहे. दरम्यान जळगाव विमानतळाच्या विस्तारीकरणाचा मार्ग या सर्व प्रक्रियांमुळे मोकळा झाला आहे. जळगावच्या विकासासाठी हा महत्वाचा निर्णय मानला जात आहे.

Next Post
मेघालयच्या तरुणीवर भुसावळात अत्याचार

मेघालयच्या तरुणीवर भुसावळात अत्याचार

ताज्या बातम्या

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा

February 26, 2026
‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या
जळगाव जिल्हा

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

February 26, 2026
रावेर पोलिसांची मोठी कारवाई; बुऱ्हाणपूरच्या व्यापाऱ्याला लुटणारे ७ संशयित जेरबंद!
गुन्हे

रावेर पोलिसांची मोठी कारवाई; बुऱ्हाणपूरच्या व्यापाऱ्याला लुटणारे ७ संशयित जेरबंद!

February 25, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group