किरण चौधरी | जामनेर, (प्रतिनिधी) : तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल मालदाभाडी या शाळेत मराठी दिना निमित्त खान्देश कन्या बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांचा जागर कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी अस्सल खान्देशी ठेक्यात बहिणाबाईंच्या कविता सादर केल्या.
कार्यक्रमाच्या पूर्वार्धात इयत्ता नववीचे विद्यार्थी संदेश खुरपडे, रोशनी काळे, प्रतीक्षा खराटे यांनी मराठी भाषेचा महिमा आपल्या भाषणातून विषद केला. पारंपरिक वेशभूषा केलेल्या या विद्यार्थ्यांचे प्रत्येक जण कौतुक करत होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे प्र. मुख्याध्यापक एस. आर. शिकोकारे हे होते. ए. बी. पाटील, एन. जी. पाटील, आर. एल. कोळी. व्ही. आर. सैतवाल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जागृती बोरसे, प्रास्ताविक ऋतुजा पाटील यांनी केले. तर आभार दिव्या मंगळकर हीने मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मनोज जैन, राजेश मोरे, तुषार उंबरकर, कार्तिक बडगुजर, गौरव बोरसे, प्रतिक गायके, सार्थक पोकळे, राज पालवे, अमर पारधी, सागर पालोदे, सागर पाटील, कुणाल कोळी, मोहिनी बहुरुपे, शिवानी चोपडे, लीना बडगुजर, कोमल बाविस्कर, गायत्री कुटे, रोशनी पारपोळ, भाग्यश्री थाटे, प्राजक्ता पाटील यांनी परिश्रम घेतले.