जळगाव, (प्रतिनिधी) : नूतन मराठा महाविद्यालयात सायन्स असोसिएशनतर्फे ‘नूतन सायन्स गोल्डन स्टुडन्ट’ या मोहिमेअंतर्गत भौतिकशास्त्र विभागाच्या विद्यार्थी, विद्यार्थिनींनी ‘वर्ल्ड ग्रेट सायंटिस्ट’ या विषयाचे पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संगणक क्षेत्रातील नवीन संकल्पना, रसायनशास्त्र विभागातील क्विज परीक्षा अशा विविध प्रकारात विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले.
दरम्यान नोबेल फाउंडेशनचे अध्यक्ष जयदीप पाटील यांनी विद्यार्थी व विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना डॉ. सी.वी.रमण यांच्यानंतर भारताला नोबेल पारितोषिक का मिळाले नाही. याचे उत्तर विज्ञानवादी विद्यार्थ्यांनी शोधून वैद्यानिक दृष्टीकोन आतापासून बाळगल्यास भविष्यात निश्चितच उत्तर महाराष्ट्र विभागातील विज्ञानवादी विद्यार्थी-विद्यार्थिनी नोबेल पारितोषिक मिळवल्याशिवाय राहणार नाही असा आशावाद व्यक्त केला. तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) शाप कि वरदान याबाबत मनोरंजक वैद्यानिक माहिती दिली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉ. के .बी .पाटील, उपप्राचार्य डॉ. माधुरी पाटील, सायन्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रा.आर .बी. देशमुख उपस्थित होते. तसेच विज्ञान विभागाचे विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच विज्ञान विभागातील प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा जाधव व प्रेरणा धनगर यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उपप्राचार्य डॉ. माधुरी पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ.एस.पी.मोते, प्रा. अंजली गुरूचल, प्रा. निकिता बाऊस्कर, प्रा.अदिती चौधरी, प्रा. प्रगती पाटील, प्रा. सौरभ कचरे यांनी यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.