जळगाव, (प्रतिनिधी) : थोर समाजसुधारक संत गाडगे महाराज व स्व. सुरेश मामा नाईक यांची जयंती समस्त लाडवंजारी समाज मंगल कार्यालय येथे साजरी करण्यात आली. याप्रसंगी नवदांपत्य प्रतीक आणि विधी यांनी संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
संत गाडगेबाबांनी विवेकाच्या खराट्याने गावोगावी फिरून लोकांची मने स्वच्छ केली. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. साक्षरतेचा प्रचार-प्रसार केला. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात स्वच्छतेची शिकवण देऊन समाज सुधारणा करणारे ते थोर संत होते, असे प्रतिपादन नववधू पिता माजी नगरसेवक प्रशांत नाईक यांनी केले. यावेळी मान्यवरांसह वऱ्हाडी मंडळी उपस्थित होते.