• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पूर्ववैमनस्यातून तरुणावर प्राणघातक हल्ला ; चौघांवर गुन्हा दाखल

तलवारीने डोक्यावर वार झाल्याने तरूण गंभीर जखमी

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 24, 2025
in गुन्हे
0
पूर्ववैमनस्यातून तरुणावर प्राणघातक हल्ला ; चौघांवर गुन्हा दाखल

चाळीसगाव, (प्रतिनिधी) : तालुक्यातील राजमाने दहीवद रस्त्यावर जुन्या वादातून एका तरुणावर प्राणघातक हल्ला करून तलवारीने डोक्यावर वार करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या संदर्भात शनिवारी २२ फेब्रुवारी रोजी मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुणाल योगेश पाटील (वय-२४ रा. राजमाने ता. चाळीसगाव) हा तरुण शेती आणि दुधाचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करत होता. दि. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता कुणाल पाटील हा राजमानेहून दहिवद येथे दूध घेण्यासाठी जात होता. त्यावेळी जुन्या वादाच्या कारणावरून गौरव एकनाथ पाटील, कुणाल एकनाथ पाटील व त्याच्या सोबत असलेले अनोळखी दोन जण हे चारचाकी वाहनाने येऊन दुचाकीला धडक दिली. तसेच कुणाल पाटील याला पकडून त्याला लोखंडी रॉड आणि पाईपाने मारहाण करून गंभीर दुखापत केली. यातील कुणाल पाटील याने चारचाकी वाहनातून तलवार काढून कुणाल एकनाथ पाटील यांच्या डोक्यावर वार करून गंभीर दुखापत केली.

दरम्यान ही घटना घडल्यानंतर कुणाल पाटील याला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार झाल्यानंतर शनिवारी २२ फेब्रुवारी रोजी रात्री ७ वाजता त्याने फिर्यादी केली. त्यानुसार मेहुणबारे पोलीस ठाण्यात संशयित आरोपी गौरव एकनाथ पाटील, कुणाल एकनाथ पाटील आणि त्याच्यासोबत असलेले दोन अनोळखी व्यक्ती (सर्व रा. राजमाने ता.चाळीसगाव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोळे करीत आहे.

Next Post
सव्वा पाच लाखांची एमडी ड्रग्ज जप्त; तरूणाला मुद्देमालासह अटक !

सव्वा पाच लाखांची एमडी ड्रग्ज जप्त; तरूणाला मुद्देमालासह अटक !

ताज्या बातम्या

लाचखोर पोलीस नाईक बडतर्फ; शनिपेठ पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी नियंत्रण कक्षात रवानगी
गुन्हे

लाचखोर पोलीस नाईक बडतर्फ; शनिपेठ पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी नियंत्रण कक्षात रवानगी

April 17, 2026
जळगाव क्रिकेट लीग: जर्सी अनावरण आणि जल्लोषमय वातावरणात भव्य रॅली संपन्न
क्रिडा

जळगाव क्रिकेट लीग: जर्सी अनावरण आणि जल्लोषमय वातावरणात भव्य रॅली संपन्न

April 16, 2026
जळगावात अभाविपचा सामाजिक उपक्रम; डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त २५०० नागरिकांना शीतपेय वाटप
जळगाव जिल्हा

जळगावात अभाविपचा सामाजिक उपक्रम; डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त २५०० नागरिकांना शीतपेय वाटप

April 16, 2026
जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा ‘रेड अलर्ट’; जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे निर्देश
जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा ‘रेड अलर्ट’; जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे निर्देश

April 16, 2026
जैन इरिगेशनमध्ये अग्निशमन सेवा सप्ताह साजरा
जळगाव जिल्हा

जैन इरिगेशनमध्ये अग्निशमन सेवा सप्ताह साजरा

April 16, 2026
आईला जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधम जेरबंद
गुन्हे

आईला जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधम जेरबंद

April 16, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group