• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कृषी कार्यालयात गळफास घेऊन कर्मचाऱ्याची आत्महत्या

सिल्लोड कृषी कार्यालयातील घटना, मयत जळगाव शहरातील रहिवासी

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 22, 2025
in जळगाव जिल्हा
0
कृषी कार्यालयात गळफास घेऊन कर्मचाऱ्याची आत्महत्या

जळगाव, (प्रतिनिधी) : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कृषी सहाय्यक असलेल्या कर्मचाऱ्याने वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने कृषी कार्यालयात खळबळ उडाली आहे. दरम्यान याप्रकरणी तालुका कृषी अधिकाऱ्यासह एका कृषी सहाय्यक कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत कर्मचारी जळगावच्या जैनाबाद येथील रहिवासी आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कृषी सहाय्यक म्हणून कार्यरत योगेश शिवराम सोनवणे (वय ४०) असे आत्महत्या करणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, १ मुलगी असा परिवार आहे. दरम्यान योगेश सोनवणे हे नेहमीप्रमाणे कार्यालयात गेले होते. कार्यालयात अन्य कोणी कर्मचारी नसताना त्यांनी गळफास घेतल्याचे सांगण्यात येत आहे. गळफास घेण्यापूर्वी त्यांनी मोबाइलमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करत आत्महत्या करण्याचे कारण यात सांगितले आहे.

योगेश सोनवणे यांनी केलेल्या व्हिडिओमध्ये कार्यालयात होणारा त्रास आणि आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांची नावे त्यांनी स्पष्ट केली आहेत. तर योगेश सोनवणे यांना तालुका कृषी अधिकारी आणि कृषी सहायक मानसिक त्रास देत होते. तसेच अपमानास्पद वागणूक देऊन सुटीच्या दिवशी अतिरिक्त काम लावले जात होते. या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

दरम्यान घटनेबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा केला. तर मृत योगेश सोनवणे यांच्या पत्नी विमल सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बरधे आणि कृषी सहायक किशोर बोराडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.

 


 

Next Post
दुचाकी सह चोरटा अटकेत ; २ दुचाकी जप्त

दुचाकी सह चोरटा अटकेत ; २ दुचाकी जप्त

ताज्या बातम्या

अवैध वाळू वाहतुकीत जप्त केलेल्या ३४ वाहनांचा १२ मार्च रोजी लिलाव
जळगाव जिल्हा

अवैध वाळू वाहतुकीत जप्त केलेल्या ३४ वाहनांचा १२ मार्च रोजी लिलाव

March 5, 2026
पोलिसांची मोठी कारवाई; ६३ किलो गांजासह दोन कार जप्त, सहा आरोपींना बेड्या
गुन्हे

पोलिसांची मोठी कारवाई; ६३ किलो गांजासह दोन कार जप्त, सहा आरोपींना बेड्या

March 4, 2026
जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम
जळगाव जिल्हा

जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम

March 2, 2026
प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group