• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

महावितरणचे काम करताना शॉक लागून मजुराचा मृत्यू

नशिराबाद येथे घडली घटना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 20, 2025
in जळगाव जिल्हा
0
महावितरणचे काम करताना शॉक लागून मजुराचा मृत्यू

जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील नशिराबाद येथे बाजारपट्टा भागात महावितरणचे काम करीत असताना ठेकेदाराकडील मजुराला खांब्यात विद्युतप्रवाह उतरल्याने विजेचा जबर धक्का बसून त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी दि. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास उघड झाली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अशोक तिजू पुराम (वय ३९, रा. सुकडी ता. देवरी जि. गोंदिया, ह. मु. भादली रोड) असे मयत मजुराचे नाव आहे. त्याच्या पश्चात वडील, पत्नी, २ मुले, भाऊ असा परिवार आहे. महावितरणने भारत इलेक्ट्रिक कंपनी, कुपवाड जि. सांगली या कंपनीला विविध कामांचे कंत्राट दिलेले आहे. त्यानुसार या कंपनीचे सुपरवायझर हर्षल कदम (रा. खेडी) यांचे सांगणेनुसार काही मजूर नशिराबाद येथे महावितरणचे काम करीत होते. दरम्यान, बुधवारी सकाळी बाजारपट्टा भागात काम सुरु असताना सिमेंटच्या खांब्यात विद्युतप्रवाह उतरून अशोक पुराम याला विजेचा जोरदार धक्का बसला व तो खाली पडला.

सोबतच्या मजुरांनी तत्काळ त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. तर मयत अशोक पुराम याच्या कुटुंबियांना गोंदिया येथे कळविण्यात आले. दुपारी शवविच्छेदन झाल्यावर मृतदेह त्याच्या गावी सुकडी येथे रवाना झाला आहे. घटनेप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Next Post
दुचाकी चोरट्यांच्या मुस्क्या आवळल्या ; दोन गुन्हे उघडकीस

दुचाकी चोरट्यांच्या मुस्क्या आवळल्या ; दोन गुन्हे उघडकीस

ताज्या बातम्या

पोलिसांची मोठी कारवाई; ६३ किलो गांजासह दोन कार जप्त, सहा आरोपींना बेड्या
गुन्हे

पोलिसांची मोठी कारवाई; ६३ किलो गांजासह दोन कार जप्त, सहा आरोपींना बेड्या

March 4, 2026
जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम
जळगाव जिल्हा

जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम

March 2, 2026
प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group