जळगाव, (प्रतिनिधी) : डाॅक्टरांच्या आयएमए संघटनेतर्फे वार्षिक सांस्कृतिक सोहळ्याचे नुकतेच आयोजन करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमातून डॉक्टरांच्या कलागुुणांचे दर्शन घडले. दरम्यान सोहळ्याचे उदघाटन आयएमए सचिव डॉ.अनिता भोळे, अध्यक्ष डॉ. सुनिल गाजरे, आयएमए महाराष्ट्र राज्य कृती समिती अध्यक्ष डॉ. विलास भोळे, सांस्कृतिक समिती अध्यक्ष डॉ. मुर्तजा अमरेलीवाला, सचिव डॉ. ऋचा नवाल यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमात एकाहून एक सरस गायन, नृत्य कला सादर करण्यात आल्यात. सुमधुर संगीतमय सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध झाले. यानंतर ग्लोबल वॉर्मिंग या महत्त्वपूर्ण विषयावर प्रभावी विनोदी लघुनाटिकेतून पर्यावरण समतोलाचा संदेश देण्यात आला. राजस्थानमधील प्रसिद्ध लोकनृत्य कालबेलिया या नृत्याविष्काराने संपूर्ण सभागृह मंत्रमुग्ध झाले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, ऐश्वर्या रेड्डी, डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील, सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना व शिक्षिका डॉ. अपर्णा भट कासार यांच्यासह वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांनी आपल्या मनोगतातून डॉक्टरांच्या विविध कलागुणांचे कौतुक केले व समाजासाठी वैद्यकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक योगदानाबाबत प्रेरणादायी विचार मांडले. तसेच आयएमएच्या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले. कार्यक्रमात जवळजवळ ४०-५० डॉक्टरांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयएमए अध्यक्ष आणि सचिव यांच्यासह डॉ. वैशाली ललित चौधरी (नाटककार), आणि त्यांच्या टीमने योगदान दिले. सुत्रसंचालन डॉ. प्रिती जोशी आणि डॉ. माजिद खान यांनी केले.