• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

समस्यांना उत्तर शोधणाऱ्या युवकांची राष्ट्राला गरज.. – डॉ.जयेंद्र लेकुरवाळे

गांधी रिसर्च फाऊंडेशन आयोजित ग्राम संवाद सायकल यात्रेचा समारोप

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 11, 2025
in जळगाव जिल्हा
0
समस्यांना उत्तर शोधणाऱ्या युवकांची राष्ट्राला गरज.. – डॉ.जयेंद्र लेकुरवाळे

जळगाव, (प्रतिनिधी) : आज राष्ट्राला समस्यांचे उत्तर शोधणाऱ्या युवकांची गरज असून ग्राम संवाद सायकल यात्रेत सहभागी सर्व यात्रींनी हे दाखवून दिले आहे; राष्ट्रासमोरील समस्यांचे उत्तर गांधीजींच्या विचारात असून आपण ग्राम संवाद सायकल यात्रेच्या माध्यमातून हे काम प्रामाणिकपणे केल्याचे दिसून येते असे प्रतिपादन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे यांनी केले. गांधी रिसर्च फाऊंडेशन आयोजित ग्राम संवाद यात्रेच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या रिसर्च विभागाच्या डीन डॉ. गीता धर्मपाल, अकॅडेमिक विभागाचे डीन डॉ. अश्विन झाला, संस्थेचे समन्वयक उदय महाजन व यात्रा प्रमुख गिरीश कुळकर्णी उपस्थित होते.

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने ३० जानेवारी ते १० फेब्रुवारी या कालावधीत ग्राम संवाद सायकल यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. फ्रान्स, नेपाळसह भारतातील विविध राज्यातील ३५ युवकांचा यात्रेत सहभाग होता. यात्रेत जळगाव, यावल व चोपडा तालुक्यातील ४८ गावांना भेटी देण्यात आल्या. चारित्र्य निर्माण या संकल्पनेने स्वस्थ्य व्यक्ती… स्वस्थ्य समाज… निर्मितीसाठी १ लाखाहून अधिक विद्यार्थी, विद्यार्थिनी व नागरिकांशी संवाद साधण्यात आला. यासाठी प्रदर्शनी, प्रश्नमंजुषा, पीस गेम, सापशिडी, पथनाट्य आदींचा वापर करण्यात आला.

आपल्या मनोगतात बोलतांना डॉ. लेकुरवाळे पुढे म्हणाले कि, आजच्या युवकांनी ग्रामीण भारताला समजून घेतले पाहिजे. गांधीजींची स्वयंपूर्ण गावाची संकल्पना साकारण्यासाठी गावाला समजणे आवश्यक आहे. एका बाजूला खेडी ओस पडत असतांना आपण ग्राम संवाद सायकल यात्रेच्या माध्यमातून गाव, तेथील संस्कृती समजून घेण्याचा केलेला प्रयत्न स्तुत्य आहे. विविध प्रकारच्या व्यसनांपासून तरुणांनी दूर राहावे व एक चांगला नागरिक बनण्यासाठी केलेले जाणीव निर्माणाचे कार्य कौतुकास्पद आहे.

कार्यक्रमाची सुरुवात प्रशांत सूर्यवंशी यांच्या गीताने झाली. मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधीजींच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. शुभम खरे, डॉ. निर्मला झाला, यश मानेकर, गायत्री कदम व सत्येन्द्रकुमार यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून सायकल यात्रेच्या १२ दिवसांचा आढावा घेतला. दीप राज भट्टराइ (नेपाळ), गुलाब भडागी, प्रेमकुमार परचाके, मयूर गिरासे, नीर झाला, हाफसा हारिस, अलेक्सिस (फ्रान्स), मुकेश यादव (नेपाळ) यांनी मनोगत व्यक्त केले.

सर्व सहभागी सायकल यात्रींना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तिपत्रके वितरित करण्यात आली. डॉ. अश्विन झाला यांनी आभार मानले तर गिरीश कुळकर्णी यांनी सूत्र संचालन केले. कार्यक्रमास दीपक मिश्रा, चंद्रकांत चौधरी, विक्रम अस्वार, सागर टेकावडे, अजय वंडोळे, ज्योती सोनवणे, विश्वजित पाटील, ऐश्वर्या तांबे, सुशीला बेठेकर, नेहा पावरा, प्राजक्ता ढगे, शिवम राठोड, उमेश गुरमुले, रोशिनी (मणिपूर), विनोद पाटील, शिवाजी मराठे या सायकल यात्रींसह गांधी रिसर्च फाउंडेशनचे सहकारी उपस्थित होते.


Next Post
सांस्कृतिक कार्यक्रमातून डॉक्टरांच्या कलागुुणांचे घडले दर्शन

सांस्कृतिक कार्यक्रमातून डॉक्टरांच्या कलागुुणांचे घडले दर्शन

ताज्या बातम्या

बिल पास करण्यासाठी अधिकाऱ्याने मागितली लाच ! एसीबीने रंगेहात पकडले; गुन्हा दाखल
खान्देश

बिल पास करण्यासाठी अधिकाऱ्याने मागितली लाच ! एसीबीने रंगेहात पकडले; गुन्हा दाखल

October 16, 2025
स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई!.. पेट्रोल पंप दरोड्याचा पर्दाफाश; सहा आरोपी जेरबंद, मुद्देमाल जप्त
खान्देश

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई!.. पेट्रोल पंप दरोड्याचा पर्दाफाश; सहा आरोपी जेरबंद, मुद्देमाल जप्त

October 16, 2025
संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश
खान्देश

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश

October 14, 2025
मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श
कृषी

मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श

October 14, 2025
जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा’ने सन्मानित
खान्देश

जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा’ने सन्मानित

October 14, 2025
अवैध गांजा वाहतुक करणारे दोन तस्कर जेरबंद!; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
खान्देश

अवैध गांजा वाहतुक करणारे दोन तस्कर जेरबंद!; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

October 14, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group