• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगावच्या शासकीय रुग्णालयात “गुलेन बारे सिंड्रोम”चा पहिला रुग्ण दाखल ; उपचार सुरु

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 31, 2025
in आरोग्य
0
जळगावच्या शासकीय रुग्णालयात “गुलेन बारे सिंड्रोम”चा पहिला रुग्ण दाखल ; उपचार सुरु

जळगाव, (प्रतिनिधी) : राज्यभरात गुलेन बारे सिंड्रोम अर्थात जीबीएस आजाराचा पहिला रुग्ण जळगाव तालुक्यात आढळून आला आहे. विशेष म्हणजे कुठलीही “ट्रॅव्हल्स हिस्ट्री” नसताना मात्र एका ४५ वर्षीय महिलेला हा आजार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात वैद्यकीय पथकाच्या निगराणीखाली उपचार सुरु आहेत.

जळगाव तालुक्यातील एका भागात रहिवासी असलेली ४५ वर्षीय महिलेला अशक्तपणा, अंगदुखी, खांदे दुखणे, पाठ दुखणे, अचानक चालण्यास-बसण्यास त्रास होणे अशी लक्षणे जाणवली. कुटुंबीयांनी तातडीने या महिलेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. याबाबत औषधवैद्यक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. पाराजी बाचेवार यांनी माहिती दिली.

सदर महिला कुठल्याही गावाला गेली नव्हती. त्यामुळे तिला ट्रॅव्हल्स हिस्ट्री नाही. तसेच, राहत्या घरीच हि अशक्तपणाची लक्षणे जाणवायला लागली होती. त्यामुळे कुटुंबीयांनी तातडीने रुग्णालयात आणल्यामुळे सध्या महिलेची प्रकृती स्थिर आहे. न्यूरॉलॉजिस्ट डॉ. गोपाल घोलप, डॉ.अभिजित पिल्लई यांच्या देखरेखीखाली रुग्णाच्या प्रकृतीवर देखरेख ठेवली जात आहे, असे डॉ. बाचेवार यांनी सांगितले. आजारातील बहुतांश रुग्ण बरे होतात. राज्यात एकदम कमी रुग्णांना व्हेंटिलेटरची आवश्यकता पडत आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. पाणी उकळून पिणे, स्वत:ची रोगप्रतिकारक्षमता वाढविणे तसेच स्वच्छ पाण्याचा आग्रह धरणे या उपाययोजना महत्त्वाच्या आहेत, असेही डॉ. बाचेवार म्हणाले.

▪️जीबीएस आजाराची सर्वसाधारण लक्षणे..
▪️अचानक पायातील किंवा हातात येणारी कमजोरी / लकवा.
▪️अचानकपणे उद्भवलेला चालण्यातील त्रास किंवा कमजोरी.
▪️डायरिया (जास्त दिवसांचा)
▪️नागरिकांनी घ्यावयाची काळजी*
▪️पिण्याचे पाणी दुषित राहणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. उदा. पाणी उकळून घेणे.
▪️अन्न स्वच्छ आणि ताजे असावे.
▪️वैयक्तिक स्वच्छतेवर भर देण्यात यावा.
▪️शिजलेले अन्न आणि न शिजलेले अन्न एकत्रित न ठेवल्यासही संसर्ग टाळता येईल.

Next Post
श्री गुरु गोरक्षनाथ मंदिरात धर्मबीज सोहळा उत्साहात साजरा

श्री गुरु गोरक्षनाथ मंदिरात धर्मबीज सोहळा उत्साहात साजरा

ताज्या बातम्या

एसीबी धडक कारवाई; महावितरणचा अभियंता २ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडला
गुन्हे

एसीबी धडक कारवाई; महावितरणचा अभियंता २ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडला

July 22, 2026
चिकूचे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नशिराबाद पोलिसांकडून आरोपीला बेड्या
गुन्हे

चिकूचे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नशिराबाद पोलिसांकडून आरोपीला बेड्या

July 22, 2026
डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान
आरोग्य

डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

July 22, 2026
कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन
क्रिडा

कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन

July 22, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन
आरोग्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन

July 22, 2026
अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश

July 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add