• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

ऑरगॅनिक जैविक शेतीची चळवळ गावागावात उभारणार

रुरल चेंबर ऑफ कॉमर्स व ऑरेंज सिटी लिसेसचा उपक्रम

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
January 28, 2025
in जळगाव जिल्हा
0
ऑरगॅनिक जैविक शेतीची चळवळ गावागावात उभारणार

जळगाव, (प्रतिनिधी) : रुरल चेंबर ऑफ कॉमर्स व ऑरेंज सिटी लिसेसने शेतकऱ्याचे संघर्ष समजून घेत, रासायनिक खतांच्या अतिवापरामु‌ळे निर्माण होणाऱ्या समस्यांना लक्ष्य केले आहे. या समस्यांवर उपाय म्हणून पेटंटेड जैव-उत्तेजक आणि जैव-कीटकनाशक ही उत्पादने संपूर्ण संशोधनातून विकसित केली आहेत. शेतकऱ्यांसाठी हे किफायतशीर ठरणार आहेत, अशी माहिती रुरल चेंबर ऑफ कॉमर्सने मंगळवारी दिनांक २८ जानेवारी रोजी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला संजय देशमुख, यशवंत मोरे, जैन उपस्थित होते. ऑरेंज सिटी लिसेस व रुरल चेंबर ऑफ कॉमर्स याची भागीदारी शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवणे, मातीचे आरोग्य सुधारणे आणि शाश्वत शेतीसाठी नवा पायंडा घालणे यावर केंद्रित आहे. आरसीसीच्या माध्यमातून या नाविन्यपूर्ण उत्पादनाचा प्रचार व प्रसार केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

पेटंटेड जैव-उत्तेजक आणि जैव-कीटकनाशक ही उत्पादने कमीत कमी खर्चात आधुनिक जैविक शेतीला चालना देत शेतकऱ्यांना शाश्वत व किफायतशीर शेतीचे नवे पर्याय उपलब्ध करून देत आहेत. रुरल चेंबर ऑफ कॉमर्स ऑफ इंडिया प्रत्येक गावात एक प्रतिनिधी नेमणार असून, हा प्रतिनिधी शेतकऱ्याऱ्यांना जैविक शेतीचे प्रशिक्षण देईल आणि पेटंटेड जैव-उत्तेजक आणि जैव-कीटकनाशक ही उत्पादने सहज उपलब्ध करून देणार आहेत.

ही चळवळ प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नैसर्गिक शेती राष्ट्रीय अभियान व भारताला ऑर्गनिक राष्ट्र बनवण्याच्या मिशनशी सुसंगत आहे. जैविक उत्पादने पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जागतिक बाजारपेठ निर्माण करणे हा देखील या चळवळीला महत्त्वाचा भाग आहे.

Next Post
शिवसेना (उबाठा) तर्फे जळगावात एसटी चक्काजाम आंदोलन

शिवसेना (उबाठा) तर्फे जळगावात एसटी चक्काजाम आंदोलन

ताज्या बातम्या

पोलिसांची मोठी कारवाई; ६३ किलो गांजासह दोन कार जप्त, सहा आरोपींना बेड्या
गुन्हे

पोलिसांची मोठी कारवाई; ६३ किलो गांजासह दोन कार जप्त, सहा आरोपींना बेड्या

March 4, 2026
जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम
जळगाव जिल्हा

जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम

March 2, 2026
प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group