जळगाव, (प्रतिनिधी) : सूर्योदय सर्वसमावेशक मंडळ, जळगाव आयोजित राज्यस्तरीय बाविसव्या सूर्योदय साहित्य संमेलनात जळगाव येथे नागनाथ कोत्तापल्ले सभागृहात विद्रोही कवी साहेबराव मोरे यांना मान्यवरांच्या हस्ते सूर्योदय शब्ददीप गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी समसंमेलनाध्यक्ष सुप्रसिद्ध लेखक प्रा.डॉ. संजीव गिरासे (धुळे), ज्येष्ठ पत्रकार किरण अग्रवाल, लेखिका प्रा. सुमन मुठे (नाशिक) व समारोप अध्यक्ष प्रा. डॉ. तुषार चांदवडकर, सतीष जैन, साहेबराव देवराम पाटील, साहेबराव पाटील आदि उपस्थित होते. साहित्य संमेलनासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने साहित्यिक, समीक्षक, लेखक, कवी उपस्थित होते.
ज्येष्ठ समीक्षक साहेबराव मोरे यांना १९९७ मध्ये डॉ.आंबेडकर फेलोशिप अवार्ड देऊन राष्ट्रपती के. आर. नारायण यांच्या हस्ते गौरविण्यात आले होते. त्यांच्या साहित्याचा आय.सी.बी. कॅम्बरीज, इंटरनॅशनल ऑथर अन्ड रायटर्स व्हूज व्हू -२७ व्या पब्लिकेशन मध्ये समावेश करण्यात आला आहे. ते खानदेश साहित्य परिषदचे संस्थापक अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.