जळगाव, (प्रतिनिधी) : पुष्पक एक्सप्रेसला आग लागल्याच्या भीतीने प्रवाशांनी रेल्वेतून उड्या मारल्याने पाचोर्याजवळ समोरून येणाऱ्या कर्नाटक बंगळूर एक्सप्रेस खाली चिरडल्याने सात ते आठ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
दरम्यान जळगाव कडून मुंबईकडे जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसच्या डब्याला आग लागल्याची चर्चा झाल्याने पाचोरा जवळील परधाडे जवळ पुष्पक एक्सप्रेस आली असता गाडीला आग लागल्याची प्रवाशांना शंका आल्याने प्रवाशांमध्ये भीती निर्माण होऊन त्यांनी गाडीतून उड्या मारायला सुरुवात केली. याचवेळी समोरून येणाऱ्या कर्नाटक बंगळूर एक्सप्रेस आल्याने ही दुर्दैवी घटना घडली आहे.
ही घटना साधारण पाच ते साडेपाच वाजेच्या दरम्यान घडली असून यात सात ते आठ प्रवासी मृत्यूमुखी पडले असून सहा सात प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. रेल्वे प्रशासन व जिल्हा प्रशासनाच्या वतीने तात्काळ धाव घेऊन मदत कार्य सुरू करण्यात आले.
या घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत एक्स हॅण्डल वरून शोक व्यक्त केला तसेच अभ्यास तरी मदतीला वेग देण्याच्या सूचना करून व्यक्तींच्या उपचारासाठी तातडीने व्यवस्था करण्यात येत असल्याचे सांगितले.